राम एका पक्षाची मालमत्ता नाही… नाहीतर आम्हाला भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल – उद्धव ठाकरे

नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन बोलावण्यात आले असून राज्यभरातील शिवसैनिक या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गट लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे.
आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
न्यायाविरूद्ध लढण्यासाठी ज्यांनी महाराष्ट्रात ठिणगी पेटवली त्या बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. त्यांना मी अभिवादन करतो. अनेकांनी रामाचे मुखवटे घातले आहेत. पण तुम्ही माझी तुलना रामाशी केली नाही त्यासाठी धन्यवाद.
जो महाराष्ट्रावर चालून आला, त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. राम एका पक्षाची मालमत्ता नाही. नाहीतर आम्हाला भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल, उद्धव ठाकरे यांनी असा टोला लगावला.
काल तिकडे सगळे अंधभक्त एकत्र झाले होते. कोणी तरी म्हटले की मोदी शिवाजी महाराज आहेत. अजिबात नाही. कोणीही नाही, शिवाजी महाराज यांच्यामुळे काल तुम्ही अयोध्येत गेला. आम्ही शिवनेरीची माती घेऊन अयोध्येत गेलो आणि वर्षभरात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
राम की बात हो गयी अब काम की बात करो. 75 वर्षात काँग्रेसने काय केले विचारता, तुम्ही 10 वर्षात काय केले ते सांगा? हिंमत असेल तर मैदानात या, शिवसैनिक हे माझी वडिलोपार्जित आहे. चोरून मिळवले नाही, भाजपमुळे दिल्ली दिसली नाही. माझ्या शिवसैनिकांमुळे दिल्ली दिसली असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
कोविड काळातील घोटाळे काढता. पीएम केअर फंडाचा घोटाळा काढा? पंतप्रधान केअर फंड खासगी फंड आहे असे सांगतात. पंतप्रधानपद गेल्यानंतर तुम्ही काय घेऊन जाणार आहात? घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडपासून सुरू झाली.
ऍम्ब्युलन्स मध्ये 8 हजार कोटींचा घोटाळा केला. आम्हाला बोलतात काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसवाले झाले. तीस वर्षे सोबत राहून भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले काय होऊ, असेही ठाकरे म्हणाले.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now : 9421379055 | 9028150765