Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुण्यातील नऱ्हे गावात चिकनशॉप चालकाने पोलिसांसह नागरिकांवर केला कोयत्याने वार

Spread the love

पुण्यातील नऱ्हे गावात कोयताधारी चिकनशॉप चालकाने नागरिकांवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार आज दिनांक २३ वार मंगळवार रोजी घडला या हल्ल्यात पोलीस आणि नागरिक जखमी झाले आहेत. घटनास्थळी वेळीच पोलीस दाखल झाले व पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले असून मोठा अनर्थ टळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल सोमवार रोजी चिकनशॉप चालक हातात कोयता घेऊन फिरत होता. दरम्यान आज त्याने नऱ्हे गावातील नागरिकांवर हल्ला केला. यावेळी पोलीसांनी धाव घेताच पोलीसांवर सुद्धा हल्ला केला आहे. यामध्ये दोन पोलीस व नागरिक जखमी झाले. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले आहे.

 

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now : 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!