शिवसेना आमदार अपात्रता निकालाच्या आधी, ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी…

शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने गेल्या बारा तासांपासून छापे टाकले आहेत. आज सकाळी 8.30 वाजल्यापासून ईडीचे 12 अधिकारी वायकर यांच्या निवासस्थानी कागदपत्रांची तपासणी करत आहेत.
वायकर यांनी जोगेश्वरी पूर्वेतील मनोरंजनासाठी आरक्षित जागेवर पंचतारांकित हॉटेल सुरू करण्यासाठी पालिकेकडे परवानगी मागितली होती दरम्यान, मनी लाँड्रिंगमध्ये सुमारे 500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
सप्टेंबर २०२३ मध्ये वायकर आणि त्यांच्या चार व्यावसायिक भागीदारांविरुद्ध आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यानंतर ईडीने नोव्हेंबर 2023 मध्ये ACR दाखल केला. त्यानंतर आज सकाळी येडीचे बारा अधिकाऱ्यांनी तेथे येऊन कागदपत्रांची तपासणी केली.
नोव्हेंबर 2023 मध्ये, सक्तवसुली संचालनालयाने (ED) रवींद्र वायकर आणि इतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. जोगेश्वरीमधील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच, तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याच्या आरोपाखाली वायकरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यासंदर्भात अद्याप कोणालाही समन्स बजावण्यात आलेले नाही. मात्र आज या प्रकरणी ईडीने सर्व व्यावसायिक आणि रवींद्र वायकर यांच्या घरावर छापे टाकले आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निकाल जाहीर करणार आहेत. निकालाच्या आदल्या दिवशीच ठाकरे गटातील आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765