Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर दहशदवादी हल्ला तीन जवान शहीद

Spread the love

जम्मू-कश्मी मधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला केला आहे. हा हल्ला पुंछ जिल्ह्यातील थानामंडी भागात झाल्याचे वृत्त आहे. सैन्य दलाच्या वाहनातून जवान जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला असून सैन्य दलाचे तीन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, सैन्य दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

सैन्य दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुंछच्या सुरनकोट आणि बफलियाचमध्ये सैन्यदलाने एक संयुक्त सर्च ऑपरेशन राबवले होते आज देखील एन्काऊंटर सुरु असल्याच सांगण्यात आले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांना घेरण्यासाठी अतिरिक्त सैन्यदल दाखल झाले आहे.

दहशतवाद्यांनी सैन्य दलाच्या वाहनावर पुंछ मधील सुरनकोट तालुक्यातील डेरा की गली या वनक्षेत्रात केला आहे. दहशतवादी हा हल्ला करण्यापूर्वी दबा धरुन बसले होते. त्यानंतर त्यांनी हल्ला केला असल्याचे वृत्त आहे.

जम्मू काश्मीरच्या पुंछ मध्ये झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सैन्य दलाच्या २ गाड्यांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये तीन जवान शहीद झाले आहेत. जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दुपारी साडेतीन वाजता राजौरी-थानामंडी-सूरनकोट रोडवर सावनी भागात हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी एक ट्रक आणि जिप्सीसह पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार केला.

तसेच संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एका ठोस माहितीच्या आधारे काल सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहेत. आज दहशतवाद्यांशी चकमक सुरु असल्याची माहिती मिळाल्याले ते म्हणाले. गेल्या महिन्यात देखील राजौरीच्या कालाकोट सेक्टरमध्ये दहशतवादी हल्ल्यात एक कॅप्टन आणि सैन्याचे दोन जवान शहीद झाले होते.

 

Loksabha_Winter_Session : लोकसभेतून आणखी तीन खासदारांवर निलंबनाची कारवाई


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!