Loksabha_Winter_Session : लोकसभेतून आणखी तीन खासदारांवर निलंबनाची कारवाई

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचा अवमान केल्या प्रकरणी काँग्रेसचे खासदार नकुलनाथ, डीके सुरेश आणि दीपक बैज यांना सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. निलंबित खासदारांची संख्या आता 146 वर पोहचली असून यामध्ये लोकसभेच्या 100 खासदारांचा समावेश आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज लोकसभेतील प्रश्नोत्तराचा तास समाप्त झाल्यानंतर तीन खासदारांची नावे घेत तुम्ही सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळे आणत आहात, घोषणाबाजी करत आहात आणि कागदे फाडून लोकसभा कर्मचाऱ्यांवर फेकत आहात. हे कृत्य सभागृहाच्या मर्यादेविरोधात असल्याचे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले.
घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी सदस्यांवर लोकसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, मला कोणत्याही सदस्याला विनाकारण निलंबित करायचे नाही. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. तुम्हाला इथे चर्चा करण्याचा आणि तुमचे मत मांडण्याचा अधिकार आहे.
तुम्ही लोक तुमच्या जागेवर जा, मी तुम्हाला शून्य तासात तुमचे मत मांडण्याची संधी देईल. ही पद्धत योग्य आहे का? हीच सभागृहाची प्रतिष्ठा आहे का? नियोजित पद्धतीने निलंबित करण्याबाबत बोलत आहेत, हे योग्य नसल्याचेही लोकसभा अध्यक्षांनी म्हटले.
संसदेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केल्यानंतर 14 डिसेंबरपासून खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
14 डिसेंबर रोजी विरोधी बाकांवरील 13 खासदार, 18 डिसेंबर रोजी 33 खासदार, 19 डिसेंबरला 49 आणि 20 डिसेंबरला दोन खासदारांना सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. त्याचवेळी 14 डिसेंबरला राज्यसभेतून 45 आणि 18 डिसेंबरला 45 खासदारांना निलंबित करण्यात आले होते.
लोकसभेतून आणखी तीन खासदारांवर निलंबनाची कारवाई खासदारांवर
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765