जरांगे यांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये – रामदास आठवले

यवतमाळ येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले या वेळी आगामी लोकसभेला २ आणि विधानसभेला १० जागा भाजपकडे मागणार असल्याचे म्हणाले. दरम्यान सरकारवर टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु, चर्चा करण्याऐवजी अधिवेशनात गोंधळ निर्माण केला जात आहे. सरकारची चर्चा करण्याची तयारी आहे. वेलमध्ये उतरून खासदारांनी घोषणाबाजी करणे चुकीचे आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
दिल्लीत अधिवेशन सुरू असताना तरुणांनी संसदेत उड्या मारल्या, इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. प्रेक्षक गॅलरीची उंची कमी आहे. सुरक्षा यंत्रणेकडून मोठी चूक झाली. तरुणांनी आंदोलनासाठी चुकीची तारीख निवडली, असे सांगतानाच याच दिवशी पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी संसद भवनात हल्ला केला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नवीन संसद भवनाला संविधान सदन असे नाव देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संविधानावर विश्वास आहे. त्यामुळे संविधान बदलले जाणार नाही, असेही ठळकपणे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या योजनांचा सर्वच जाती-धर्माच्या लोकांना फायदा झाला आहे. केंद्र सरकार कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. तेलंगणात केवळ काँग्रेस पक्षाला सत्ता आणता आली. येणार्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच, मराठा आरक्षण विषयी ते म्हणाले, मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळावे. सर्वच मराठा समाजातील लोक श्रीमंत नाही. जरांगेच्या मागणीप्रमाणे सरसकट दाखले देऊन प्रश्न सुटणार नाही. जरांगेच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. परंतु, जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ द्यावा. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असा त्यांनी सल्लाही दिला.
लोकसभा निवडणुकीत आरपीआयला दोन जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. शिर्डीतून स्वत: निवडणूक लढण्यास इच्छूक आहे. विधानसभा निवडणुकीत दहा जागांचा आग्रह राहणार आहे, असेही आठवले यांनी सांगितले.
सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर दहशदवादी हल्ला तीन जवान शहीद
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765