Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ParliamentNewsUpdate : गृहमंत्री अमित शहा यांनी काढल्या नेहरूंच्या दोन चुका , कॉँग्रेसचा सभात्याग

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. नेहरूंच्या चुकांमुळे पीओके निर्माण झाल्याचे ते म्हणाले. अमित शाह म्हणाले, “पंडित नेहरू पंतप्रधान असताना दोन मोठ्या चुका झाल्या, ज्याचे परिणाम काश्मीरला वर्षानुवर्षे भोगावे लागले. जेव्हा आमचे सैन्य जिंकत होते, तेव्हा पंजाबच्या भागात पोहोचताच युद्धविराम लागू करण्यात आला आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) चा जन्म झाला.

जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2023 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 वरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “जर युद्धविराम तीन दिवसांनी उशीर झाला असता, तर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आज भारताचा प्रदेश बनला असता. .” दुसरे म्हणजे आमचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेण्यात आला, ही मोठी चूक आहे.” अमित शहांच्या या विधानावर काँग्रेस खासदारांनी तीव्र आक्षेप घेतला आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

तुम्हाला रागवायचे  असेल तर नेहरूंवर रागवा…

यावर अमित शहा म्हणाले की, जर तुम्हाला रागवायचे असेल तर माझ्यावर नाही तर नेहरूंवर रागवा. यानंतर काँग्रेस खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला. अमित शाह म्हणाले, “पूर्वी जम्मूमध्ये 37 जागा होत्या, आता 43 आहेत. पूर्वी काश्मीरमध्ये 46 जागा होत्या, आता पीओकेमध्ये 47 आणि 24 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत कारण पीओके आमचा आहे.”

यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या सरकारच्या अनेक यशांची माहिती दिली. ते म्हणाले, “मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अभूतपूर्व बदल झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक व्यक्तीच्या उपचाराचा खर्च केंद्र सरकार 5 लाख रुपयांपर्यंत उचलते. आता 100 हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण होत आहेत. आणि 100 हून अधिक चित्रपटगृहांसाठीचे   बँक कर्ज प्रस्ताव प्रक्रियेत आहेत.”

लोकसभा निवडणुकीत विजयाचा दावा

दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले की, “मला विश्वास आहे की 2024 मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल आणि मला आशा आहे की 2026 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना पूर्णपणे संपुष्टात येतील.” त्यांच्या भाषणानंतर जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक लोकसभेने मंजूर केले.

पंडित नेहरूंनी शेख अब्दुल्लांना लिहिलेलं  पत्र…

एका पत्रातल्या मजकुरातला एक भाग मी वाचून दाखवतो”, असं म्हणत अमित शाह यांनी हातातील कागदावरचा एक मजकूर वाचून दाखवला. “पंडित जवाहरलाल नेहरूंनी शेख अब्दुल्लांना लिहिलेलं हे पत्र आहे. ‘संयुक्त राष्ट्राच्या अनुभवानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलोय की तिथून कोणत्याही समाधानकारक उत्तराची अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही. मला युद्धबंदी हा एक चांगला निर्णय वाटला. पण या मुद्द्यावर योग्य पद्धतीने उत्तर शोधलं गेलं नाही. आम्ही युद्धबंदीवर अधिक विचार करून काही चांगला पर्याय शोधू शकलो असतो. मला वाटतं की भूतकाळात ही आमच्याकडून झालेली चूक आहे”, असा उल्लेख असलेला मजकूर अमित शाह यांनी वाचून दाखवला.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांकडे वेगळ्या कलमानुसार नियम उपस्थित करायला हवा होता, असंही अमित शाह यांनी यावेळी नमूद केलं. “जेव्हा संयुक्त राष्ट्रांत मुद्दा न्यायचा होता, तेव्हाही घाईगडबडीत निर्णय घेतला गेला. हा मु्द्दा संयुक्त राष्ट्र नियमावलीतील कलम ३५ ऐवजी ५१ नुसार न्यायला हवा होता. अनेक लोकांनी सल्ला देऊनही तो निर्णय घेण्यात आला”, असा दावाही अमित शाह यांनी यावेळी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!