Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMediaNewsUpdate : एलोन मस्क यांना इजरायलशी संबंधित ट्विटवर कॉमेंट करणे पडले महागात आणि सुरू झाला वाद ..

Spread the love

वॉशिंग्टन डी.सी. : अब्जाधीश अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेतल्यापासून ते त्यांच्या अनेक निर्णयांमुळे चर्चेत आले आहेत. ते X वर चांगलेच सक्रिय आहेत. मात्र एका ट्विटवर कॉमेंट करणे त्यांना चांगलेच महागात पडले असून यामुळे एलोन मस्कच्या कंपनीला आर्थिक नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे. यात इजरायलशी संबंधित एक पोस्टवर कॉमेंट करताना त्यांनी ‘तुम्ही खरे सत्य सांगितले आहे.’ असे म्हटले होते.

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात एलोन मस्कने सेमिटिक विरोधी पोस्टचे समर्थन केले. यामुळे मस्क यांच्यावर सेमिटिझमला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर वॉल्ट डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसह अनेक कंपन्यांनी X वरील त्यांच्या जाहिराती बंद केल्या आहेत. तर या आठवड्यात Airbnb, Amazon, Coca Cola आणि Microsoft सारख्या मोठ्या कंपन्यांनी त्यांचे 200 हून अधिक जाहिरात युनिट्स बंद केले आहेत. परिणामी सध्या कंपनीचा $11 दशलक्ष महसूल धोक्यात आहे. तथापि, हा आकडा वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो असे सांगितले जात आहे. कारण यातील काही कंपन्या ज्यांनी X वर त्यांचे विपणन थांबवले आहे ते पुनरागमन करू शकतात. मात्र कंपनीने यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

एक्सने दावा दाखल केला…

याउलट , X ने मात्र यावर पलटवार करीत मीडिया वॉचडॉग ग्रुप मीडिया मॅटर्स विरुद्ध खटला दाखल केला आहे, त्यात असा आरोप करण्यात आला आहे की संस्थेने या वृत्ताद्वारे कंपनीची बदनामी केली आहे. याआधी मीडिया मॅटर्सने एक वृत्त चालवले होते ज्यामध्ये ऍडॉल्फ हिटलर आणि नाझी पार्टीशी संबंधित पोस्ट्स जवळ अॅपल आणि ओरॅकल इत्यादीसारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सना प्रदर्शित केल्याचा आरोप करण्यात आला होता.

अशी केली होती कॉमेंट …

अलीकडे, एका वापरकर्त्याने X वर एक व्हिडिओ पोस्ट केला असून ज्यामध्ये सेमिटिझमच्या विरोधात कॅप्शन देण्यात आली आहे. इलॉन मस्क यांना ते आवडले आणि त्यावर प्रतिक्रिया देताना लिहिले, ‘तुम्ही खरे सत्य सांगितले आहे.’ मस्कच्या या उत्तराला सेमेटिझम म्हणून पाहिले गेले आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!