Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

छगन भुजबळांच्या टीकेला जरांगे पाटलांचे प्रत्यूत्तर

Spread the love

ओबीसी समाजाच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर वैयक्तीक टीका केली. यावर आता जरांगे पाटलांनी सांगलीतील सभा संपताच प्रत्यूत्तर दिले आहे.

दरम्यान ते म्हणाले, मराठा समाजाने आता ठरवले आहे, आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. त्यांना तेच काम उरले आहे. लोकांचे खाल्ल्याने ते आतमध्ये जाऊन आले आहेत. कोण कुणाचे खात आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नाही. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत.

या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील ५० टक्के आहे. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. वयाने तुम्ही मोठे आहे, आम्हाला काढायला लावू नका. आम्ही देखील तुमचा बायोडेटा काढला आहे. धमक्या देऊ नका, असे जरांगे म्हणाले.

न्यायमुर्ती त्याला सर सर म्हणत होते, तो पाचवी पास तरी आहे का? भुजबळांची जरांगे पाटलांवर टीका

राहुल गांधींनी विजय वेडट्टीवार यांना विरोधी पक्षनेता मराठ्यांच्या मुलांचे वाटोळं करण्यासाठी दिले आहे. त्यामुळे त्याप्रमाणे ते बोलत असतील. तर, पंकजा मुंडे यांना गोरगरिबांची जाण आहे. गोपीनाथ मुंडे यांनी गोरगरिबांचे कल्याण करण्यासाठी काम केले आहे. त्यामुळे त्या या सभेला आल्या नसतील असेही जरांगे म्हणाले.

भुजबळांना निवडणुकीत पाडा असे मी कधीच म्हटले नाही. आमच्या मराठ्याच्या नेत्यांना तुम्हाला पाडणे शक्यच नाही. आमचे नेते खूप नमुनेबाज आहे तर, विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की. आम्ही तुमच्या लेकरांबद्दल कधी वाईट बोललो नाही. बकरे वगैरे म्हणून दुसऱ्यांच्या मुलांना वाईट बोलू नका. आम्ही तुमच्या लेकरांचे बकरे म्हणून कधी उल्लेख केला नाही. पण असे बोलून तुम्ही मुलांचा अपमान करत आहात. यांचा तोल गेला असेल, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला आहे.

 

आरक्षणाच्या प्रश्नावरून दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांची भुजबळांवर टीका


Live Mahanayak news

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!