Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationUpdate : बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवण्यात यावी, अशोक चव्हाण यांचा सरकारला सल्ला …

Advertisements
Advertisements
Spread the love

नांदेड  : बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवण्यात यावी, असा सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी  सरकारला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की ,  “जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही? राज्य विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावले उचलावीत; जेणेकरून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकेल,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.

देशात जातनिहाय जनगणना करावी..

“बिहारच्या या विधेयकाला तेथील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्याचेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. देशात जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षणाची  मर्यादा शिथिल करावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाने अगोदरच स्वीकारली असून, हैद्राबाद व नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत तसे ठरावही मंजूर करण्यात आले आहेत, याकडे लक्ष वेधून राज्य सरकारने याबाबत पुढाकार घ्यावा”, असे स्पष्ट विधान चव्हाणांनी केले.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!