AccidentNewsUpdate : वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर मोठा अपघात, तिघांचा मृत्यू, ९ जखमी

मुंबई : मुंबईतील वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर मोठा अपघात झाला. एका इनोव्हा गाडी चालकाने आधी मर्सिडीजला धक्का दिला आणि त्यानंतर टोल नाक्यावरून घाईत जाण्यासाठी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या दोन ते तीन गाड्यांना मागून वेगाने जोरदार धडक दिली. यात ९ नागरिक जखमी झाले. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे, तर सहा लोक जखमी असून आहेत. जखमींवर मुंबईतील भाभा रुग्णालय आणि लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
या अपघाताविषयी माहिती देताना डीसीपी कृष्णकांत उपाध्ये यांनी सांगितले की , “काल रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास एक इनोव्हा गाडी वरळीहून वांद्र्याकडे जात होती. सी लिंकवर टोल प्लाझापासून १०० मीटर अंतरावर ही इनोव्हा गाडी मर्सिडीज गाडीला घासून गेली. त्यानंतर इनोव्हा चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि टोल प्लाझावरून लवकर जाण्यासाठी पुढे येऊन दोन तीन गाड्यांना धडक दिली.” यातील तिघांचा मृत्यू झाला असून सहा लोक जखमी असून आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.
#WATCH | Mumbai: Zone 9 DCP Krishnakant Upadhyay said, "Today around 10:15 am, a vehicle was going north from Worli towards Bandra, 100 meters before the toll plaza on sea link, it collided with a vehicle. After colliding the car sped up and hit 2-3 vehicles at the toll plaza. A… https://t.co/J6JHQr4Lzj pic.twitter.com/wWRcEqMpNR
— ANI (@ANI) November 9, 2023
ही धडक एवढी भयानक होती की, पुढे उभ्या असलेल्या एका मागोमाग एक अशा सहा कार अपघातग्रस्त झाल्या. काही गाड्यांचा चकनाचूर झाला होता. यामध्ये जागेवरच तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९ जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे झोन ९ चे डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले. हा अपघात पाहताच टोलनाक्यावरील कर्मचारी देखील जीव मुठीत घेऊन तिथून पळाले होते. अपघात घडविणारी कार आदळून तिथेच थांबली. या कारचा चालक सुरक्षित असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या चालकाची चौकशी सुरु आहे.
मला मारण्याचा प्रयत्न – भाजप नेता
दरम्यान या अपघाताविषयी बोलताना जितेंद्र चौधरी यांनी म्हटले आहे की , अपघातग्रस्त कार चालकाने सी लिंकवर आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला. एका कार्यक्रमातून परतत असताना सी लिंकवर मागून आलेल्या कारने आपल्या कारला टक्कर मारली होती. मी ज्या बाजुला बसलेलो त्याच बाजुला कारने टक्कर मारली. परंतु आपली कार समुद्रात पडण्यापासून वाचली, असा दावा त्यांनी केला आहे. एनबीटीने या दाव्याचे वृत्त दिले असून जितेंद्र चौधरी हे भाजपचे नेते आहेत. यानंतर ही कार त्याच वेगाने टोल नाक्याच्या दिशेने गेली. टोल नाक्यावर गाड्या उभ्या असतील असा त्याला अंदाज नसावा. यामुळे त्याने तेथील गाड्यांना टक्कर मारली. तो ड्रायव्हर पाकिस्तानी भाषेत बोलत होता, असा दावा चौधरी यांनी केला आहे.
अपघात कसा घडला ?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वरळीहून वांद्र्याच्या दिशेनं भरधाव वेगात इनोव्हा कार जात होती. इनोव्हा कारमधून सहा प्रवासी प्रवास करत होते. ही इनोव्हा कार सर्वात आधी सी-लिंकवर मर्सिडीज गाडीला धडकली. त्यानंतर सुसाट वेगानं तिथून निघून गेली. पुढे जाऊन या कारनं वांद्रे सीलिंकवरील टोलनाक्यावर टोल भरत असलेल्या इनोव्हा आणि क्विड गाडीला पाठीमागून जोरदार धडक मारली. इनोव्हा गाडीच्या पाठोपाठ होंडा सिटी कारनंही इनोव्हा गाडीला धडक देत, वांद्रा-वरळी सी लिंकवरील टोल नाका 11 आणि 10 वरुन जाणाऱ्या टॅक्सिला धडक दिली. अचानक झालेल्या विचित्र अपघातामुळे सर्वजण पुरते घाबरले होते.
या विचित्र अपघातानंतर तात्काळ टोलनाक्यावर उपस्थित कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीनं सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तीन जणांना मृत घोषित करण्यात आलं. अपघातात हनिफ पिर, ,हमाबीबी पिर ,खतीजा हटिया या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, असीम सदर, ,हजरा सदर, बीबी सदर, राजश्री दवे, राकेश दवे, अशी जखमींची नावं आहेत. अद्याप सर्व जखमींची नावं कळू शकलेली नाही. सर्व जखमींवर मुंबईतील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून चौकशी सुरू आहे.