Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticaalUpdate : उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना , राजकीय चर्चांना फुटले तोंड ….!!

Spread the love

पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी भेट झाली. पवार कुटुंबियांच्या या भेटी दिवाळी निमित्ताने असल्याचे सांगितले जात असले तरी , या  झालेल्या भेटीबद्दल विविध तर्क-वितर्क लढवले जात आसून या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीसाठी रवाना झाले असल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेतीब्द्दाल सांगण्यात येते कि , दरवर्षी दिवाळीत बारामतीत गोविंद बाग येथे पवार कुटुंब एकत्र येते . तिथे पवार कुटुंबीय सर्वसामान्य नागरिकांकडून दिवाळीच्या शुभेच्छा स्वीकारतात. गाठी-भेटी होतात. दरम्यान प्रतापराव पवार यांच्या पत्नीची तब्येत बरी नसल्याने त्यांना गोविंद बागेत येणे  जमणार नाही, म्हणून सर्व पवार कुटुंबीय  आज प्रतापवार पवारांच्या निवासस्थानी जमले  होते. प्रतापराव पवार हे शरद पवार यांचे चुलत बंधू आहेत. विशेष म्हणजे प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भेटीनंतर अजित पवार दिल्ली दौऱ्यावर …

अजित पवार या भेटीनंतर दिल्लीला रवाना झाले असून ते  दिल्लीत अमित शाह यांना भेटणार असल्याची माहिती आहे. अजित पवार यांना डेंग्यु झाला होता. त्यामुळे मागच्या काही दिवसात ते दिसले नव्हेत. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला होता. आता अजित पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवार नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कौटुंबिक भेटीत काय चर्चा झाली? दिल्ली भेटीचा उद्देश काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच मिळतील. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाने शरद पवार गटापेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला.

सकाळी वळसे पाटलांनी घेतली शरद पवार यांची भेट …

दरम्यान अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे  दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या बैठकीनंतर आज दुपारी पुण्यात बाणेरमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांचे  बाणेरमध्ये निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित दादांसह प्रफुल पटेल देखील अमित शाहांना भेटणार असल्याच्या चर्चा आहेत.अजित पवार गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र अजितदादांच्या दिल्लीला रवाना होण्यावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!