Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaraathaAndolanNewsUpdaate : आणखी एका मराठा समाजाच्या तरुणाची अत्महत्या …

Spread the love

हिंगोली : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून हिंगोली जिल्ह्यात आणखी एका मराठा तरुणानेआपले जीवन संपवले आहे. या तरुणाने घरातील विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली आहे. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. ज्यात, मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय?, असा त्याने उल्लेख केला आहे. आदिनाथ राखोंडे (वय २७ वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्यांचा सत्र थांबताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील आजरसोंडा येथील २७ वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी विजेच्या ताराला स्पर्श करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आदित्य राखोंडे असं मयत युवकाचे नाव असून, तो उच्चशिक्षित होता. मात्र, असे असतांना नोकरी मिळत नसल्याने तो चिंतेत होता. विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आदित्यचा सहभाग होता.

सुसाईड नोटमध्ये काय लिहलं?

एक मराठा लाख मराठा…मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझे जीवन संपवत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!