Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वेळ घ्यायचं तर घ्या… पण सगळ्या भावांना आरक्षण द्या म्हणत, जरांगे पाटील यांनी सोडलं उपोषण

Advertisements
Advertisements
Spread the love

गेल्या आठवडाभरापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज उपोषण थांबवले आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाप्रश्नी गंभीर असून ८ डिसेंबर रोजी त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचे आश्वासन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले असल्याने, मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असल्याचे सांगत ही शेवटची वेळ असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Advertisements

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ जालन्यात आले. त्यामध्ये दोन निवृत्त न्यायाधीशांचाही समावेश आहे. त्यांनी मनोज जरांगे यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. एक दोन दिवसात हा निर्णय होणार नाही, त्यासाठी काही वेळ देण्याची मागणी त्यांनी केली. असे घाई गडबडीत दिलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारं नाही असेही त्यांनी जरांगे यांना समजावून सांगितले. आपल्याला अपेक्षित आरक्षण नक्की मिळेल, पण त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल अशी विनंती या समितीकडून जरांगेंना करण्यात आली आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी ८ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचेही आश्वासन दिले. शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनावर बोलताना मनोज जरांगे यांनी आपण सकारात्म असल्याचे सांगितले असून सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल आणि सर्व गुन्हे मागे घेणार असाल तर आपण राज्य सरकारला वेळ देण्यास तयार असल्याचे सांगितले.

Advertisements
Advertisements

मात्र जर सरकारने दगाफटका केला. तर यांच्या पूर्ण नाड्या बंद करू. चलो मुंबईची घोषणा करून मुंबई बंद करून टाकू. आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक सरकारच्या सगळ्या नाड्या बंद करू, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारला आम्ही वेळ देत आहोत. मात्र ही वेळ शेवटची आहे.

MaratahaAndolanNewsUpdate : राज्य सरकारचे शिष्ट मंडळ जरांगेच्या भेटीला तर देवेंद्र फडणवीस शहांच्या भेटीला …


Live Mahanayak news

Mahanayak news Updates on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!