Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaratahaAndolanNewsUpdate : राज्य सरकारचे शिष्ट मंडळ जरांगेच्या भेटीला तर देवेंद्र फडणवीस शहांच्या भेटीला …

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले असून आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. राज्यात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या असून सर्वत्र तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्या शासनाचे शिष्टमंडळ विशेष विमानाने या आंदोलनाचे नेते मानोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहे. या शिष्टमंडळाच्या वतीने सरकार करत असलेल्या कारवाईची माहिती देऊन जरांगे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेण्याची विनंति केली जाणार असल्याचे वृत्त आहे. या शिष्टमंडळात निवृत्त न्यायमूर्ती आणि मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेण्याच्या मागणीसाठी तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी पक्षाचे आमदार मंत्रालयासमोर आंदोलन करीत आहेत.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या समाजाची नाराजी परवडणारी नाही हे लक्षात घेऊन भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचेही वृत्त आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील. मराठा आरक्षणाबाबत पक्ष नेतृत्वाशी हे नेते चर्चा करणार आहेत. आज दुपारी 3.30 वाजता या विषयावर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आरक्षण कोटा वाढवण्यासाठी केंद्राकडून ठोस पाऊल उचलण्याची अपेक्षा सर्व पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

राजकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्र महत्त्वाचा

पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपला मराठा समाजाचा रोष ओढवून घेणे पारवडणारे नाही कारण लोकसभेच्या सर्वाधिक ४८ जागा उत्तर प्रदेशच्या नंतर महाराष्ट्रात आहेत. यापॆकी महाराष्ट्रात ४५ जग जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत दिल्लीच्या पक्ष नेतृत्वाकडून काही सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.

आमदारांचे आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बुधवारी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयाच्या गेटला टाळे ठोकले होते. यानंतर पोलिसांनी या आमदारांना व्हॅनमध्ये घालून नेले होते. आज पुन्हा तिसऱ्या दिवशी हे आमदार मंत्रालयाबाहेर दाखल झाले आणि त्यांनी विशेष अधिवेशनाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन सुरु केले. आज पुन्हा पोलिसांनी या आमदारांची धरपकड केली आहे. आज वानखेडे स्टेडिअमवर भारत वि. श्रीलंका मॅच आहे. असे असताना आमदारांनी मंत्रालयाबाहेरच रास्ता रोको केल्याने कोंडी निर्माण झाली होती. यावेळी आमदारांनी आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही, मराठा आंदोलन मिळेपर्यंत आम्ही एकाच पक्षाचे असल्याच्या घोषणा दिल्या. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी हे आंदोलन करण्यापेक्षा त्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करावी अशी टीका केली.

९ व्या दिवशी आंदोलनाचा भडका कायम

दरम्यान राज्यभरात मराठा आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा भडकलेलाच असून, बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी तर जालन्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, आमरण उपोषण करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, मंगळवारी दिवसभरात सात जणांनी मृत्यूला कवटाळले. दरम्यान जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे काल रात्रीपासून पाणी सोडल्याने मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत.

या शिष्टमंडळामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्यासह निवृत्त न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव जरंगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी सरकारकडून मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाजू त्यांना समजवून सांगितली जाणार आहे, तसेच त्यांना उपोषण मागे घेण्यासही सांगितले जाणार आहे.

होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार

दरम्यान आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. परंतु, सरकार खोट्या केसेस दाखल करीत आहे. केसेसला घाबरून आरक्षणाच्या लढ्यातून मागे सरकू नये. आरक्षणासाठी सर्व पुरावे आहेत. तरीही जाणून बुजून आरक्षण दिले जात नाही. आता आम्हाला लढावे लागेल. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता.

सरकारने वातावरण दूषित करू नये. आता माझे बोलणे कधी बंद होईल, हेच मला माहिती नाही. त्यामुळे शासनाने वेळ कशासाठी हवा, किती हवा, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का हे इथं येवून सांगावे. आम्हाला त्यांचे म्हणणे योग्य वाटले तर आम्ही वेळ देवू अन्यथा एक तासही देणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले होते. त्यानुसार सरकारने त्यांच्याशी चर्चेची तयारी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!