Manoj Jarange Patil News update : मनोज जरांगे पाटील अचानक मुंबई दौऱ्यावर, मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर…

औरंगाबाद : जालना येथील आंतरवाली सराटीमधील सभेनंतर काल औरंगाबादेत माध्यम संवाद दौरा आटोपून आज तातडीने मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान सरकारने दिलेल्या मुदतीला सात दिवस बाकी असताना मराठा आरक्षण उपसमितीची तातडीची बैठक आज मुंबईत पर पडली. यावरून सरकारने हा मुद्दा ऐरणीवर घेतल्याचे दिसून येत आहे. जरांगे पाटील यांच्या वतीने मात्र हा त्यांचा संवाद दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठा आरक्षणावरून आंतरवाली सराटी येथील विराट सभा यशस्वी झाल्यानंतर आता सुट्टी नाही, येत्या १० दिवसात हा प्रश्न निकाली लावला नाही तर २४ ऑक्टोबरनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. काल औरंगाबादेत त्यांनी सर्व माध्यमांच्या कार्यालयाला भेटी देऊन माध्यमांचे आभार मानले. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला दिलेल्या मुदतीचे आता ७ दिवस शिल्लक राहिले आहेत. सरकराने आमच्याकडून ४० दिवस घेतले असून, या चाळीस दिवसांत त्यांनी आरक्षण दिले पाहिजे. अन्यथा २४ ऑक्टोबरनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, असा थेट इशारा सरकारला दिला आहे.
https://fb.watch/nKtQai9tIa/?mibextid=2Rb1fB
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करावी
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. राज्यांकडील आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारकडे असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करून तातडीने हा निर्णय घ्यावा असा त्यांचा आग्रह आहे. त्यानुसार या हालचालींना वेग आला आहे.
मराठा आरक्षण उपसमीतीची बैठक
मराठा आंदोलनाच्या निवड पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज आयोजित केली होती या बैठकीत काय चर्चा झाली याबद्दल नेमकी माहिती सरकारकडून सांगण्यात आलेली नाही आलेली नाही मात्र दरम्यानच्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी २० तारखेपासून २४ तारखेपर्यंतचा आपला महाराष्ट्र दौरा निश्चित केला होता परंतु आज सायंकाळी अचानक ते जालन्याहून औरंगाबाद मार्गे आपल्या ताफ्यानिशी समृद्धी महामार्गाने मुंबईकडे रवाना झाले.
या दौऱ्याबाबत विचारले असता त्यांच्या समवेत असलेले मराठा आंदोलक प्रदीपदादा सोळुंके यांनी सांगितले की, उद्या मुंबईत इलेक्ट्रॉनिक मध्यमांसाठीचा हा संवाद दौरा आहे. पोलिसांना त्यांनी या सर्व दौऱ्याची पूर्वसूचना दिली आहे. या दौऱ्यात मुंबईत ते आज आणि उद्या मुक्काम करणार असून त्यानंतर ते १९ तारखेला मुंबईहून दुपारी २ वाजता जुन्नरकडे शिवनेरीसाठी रवाना होतील तेथे मुक्काम केल्यानंतर ते २० तारखेला ला पुणे दौऱ्यासाठी रवाना होतील. त्यानंतर २१ तारखेला सोलापूर दौरा करून ते २२ तारखेला आंतरवालीत पोहोचून पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर २४ तारखेला ते चौंडीकडे रवाना होतील आणि धनगर आरक्षण मेळाव्याला उपस्थित राहतील.