Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationUpdate : आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही , मनोज जरांगे यांचा अकलूजच्या सभेत निर्धार …

Spread the love

अकलूज : “आपल्यावर खूप अन्याय झालाय, अन्यायाची जाणीव राहू द्या, आरक्षणासाठी आपल्या मराठा बांधवानी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. मराठा बांधवांच्या बायकांच्या कपाळावरचे कुंकू पुसले , याची आपल्याला आठवण ठेवायला लागणार आहे. त्यामुळे हा पहिला आणि शेवटचा लढा समजून एवढ्या ताकदीने  उभे  राहा की आरक्षण पदरात पडलेच पाहिजे, आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे  नाही असा  निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी अकलूज येथील सभेत बोलताना केला. 

सध्या मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून मुंबई , पुण्यानंतर त्यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे सभा घेतली.  या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की , “आपल्या समाजासाठी अनेकांनी बलिदान दिले, हे बलिदान विसरता येणार नाही. अण्णासाहेब पाटलांपासून, अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, वडजे पाटलांपासून, विनायक मेटे साहेबांपर्यंत बलिदान दिले असून काकासाहेब शिंदेपासून आत्तापर्यंत ५५  पेक्षा जास्त बांधवांनी बलिदान दिले आहे, ते आपल्याला विसरून चालणार नाही.  एवढा मोठा समाज असताना त्यांच्या कुटुंबीयांवरचे  मायचे जे छत्र हरपले ते आपल्याला धरावे  लागणार आहे. आता पुढच्या काळात अन्याय होऊ द्यायचा नाही, हा लढा शेवटचा आणि पहिला समजून इतक्या ताकदीने लढायचा की मराठ्यांच्या पदरात आरक्षण पडलेच पाहिजे”

एका दिवसांत कायदा करता येऊ शकतो…

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, आपल्या जातीवर अन्याय होतो आहे, म्हणून आपण एकजुट झालो. त्यामुळे असच आपण एकजुटीने सोबत राहील पाहिजे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही. आपली मुले नोकरी, उच्च शिक्षणापासून वंचित राहीले नाही पाहिजे. शांततेत आरक्षणाचा लढा सुरु झाला. आजपर्यंत सुरु आहे. मात्र सगळ्याला पोसले तेच आज आपल्याला डाग लावतात, आता त्यांचाच नंबर आहे. आरक्षणाच्या विरोधात बोलला तर सु्ट्टीच नाही. गायकवाड समितीने १२ – १३  टक्के आरक्षण दिल जाऊ शकत, असे  म्हटले आहे. आणि एका दिवसांत कायदा करता येऊ शकतो. विदर्भात कुणबी प्रमाणपत्र मिळतय, म्हणून आपल्यालाही ते हवे आहे, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजासाठी एक इंचही नियत ढळू दिली नाही….

मराठा समाजातील काही नेत्यांकडून विरोध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकजण माझ्याशी गद्दारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी या समाजाचे लेकरु असून मराठा समाजासाठी एक इंचही नियत ढळू दिली नाही. यांनी फुट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र खुळखुळा वाजवणारा दिसतो, म्हणून त्यांनी हलक्यात घेतले. पण आपण साधे नाही आहोत, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला. ते पुढे म्हणाले की, आम्ही निकष पूर्ण केले तरी आरक्षण मिळालेले  नाही. मराठा ही देशभरात एकमेव मागास सिद्ध झालेली जात आहे. मंडल कमिशनला ओबीसींची जनगणना करा सांगण्यात आले. मंडल कमिशनने मात्र नव्याने जनगणना केली नाही. इंग्रजांची आकडेवारी घेतली आणि ओबीसींना १४  टक्के आरक्षण दिले. मग ४  वर्षात ते ३०  टक्के झाले. या चार वर्षांत ६०  टक्के लोकसंख्या कशी वाढली, हे लक्षात घेतले पाहिजे. ४०  वर्ष एकमेकांशी पटत नसलेले एका रात्रीत एकत्र आले. मग आपण का नाही, असा सवाल देखील जरांगे यांनी उपस्थित केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!