MarathaAndolanNewsUpdate : अखेर मुख्यमंत्री १७ व्या दिवशी मनोज जरांगे यांच्या भेटीला , उपोषण मागे घेण्याची कारणार विनंती …

औरंगाबाद : अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे यांच्या भेटीला जात आहेत . वास्तविक ते कालच आपल्या नियोजित दौऱ्यावर जरांगे यांना भेटून , त्यांच्याशी चर्चा करून उपोषण सोडणार होते परंतु सुरक्षेच्या कारणावरून आपला दौरा रद्द केला. यावरून त्यांच्यावर विरोधी पक्षांनी टीका केली. आज मात्र सकाळीच मुंबईहून येऊन मुख्यमंत्री अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उदय सावंत, राधाकृष्ण विखे पाटील हे आज मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री शिंदे हे औरंगाबाद विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर ते औरंगाबाद विमानतळावरून जालनाच्या दिशेने जाणार आहे. विशेष म्हणजे या दौऱ्याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील 16 दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणावर बसले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. मात्र आपलं अमरण उपोषण आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे यांच्या भेटीला जाणार होते. याबाबत मुख्यमंत्र्यांचा दौरा देखील आला होता. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याने, ते जरांगे यांची भेट घेणार की नाही यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जरांगे यांच्या भेटीला जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील हे देखील असणार आहे. विशेष म्हणजे उदय सामंत मुंबईच्या विमानतळावर पोहोचले असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
असा असणार दौरा?
मुख्यमंत्री शिंदे हे मुंबई विमानतळावर पोहोचणार आहे. मुंबई विमानतळावरून शासकीय विमानाने मुख्यमंत्री औरंगाबादच्या विमानतळावर दाखल होणार आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद विमानतळावर येणार असल्याची माहिती होती. मात्र यात आणखी काही तासांचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. तसेच औरंगाबाद विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या इतर मंत्र्यांसह अंतरवाली सराटी गावात पोहोचणार आहे.
आपण सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला असून उपोषण सोडण्यासाठी पाच अटी सरकारसामोर ठेवल्या होत्या त्यानुसार मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडण्यासाठी अंतरवाली सराटी येथे यावे असे म्हटले होते त्यानुसार मुख्यमंत्र्यांसमवेत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शिष्टमंडळात असणार की नाही याची कोणतीही माहिती नाही.