INDVsPAKMatchUpdate : पाकिस्तानपुढे 357 धावांचे आव्हान, पावसाने थांबवला खेळ, विराटची विराट कामगिरी, 13 हजार धावांचा टप्पा पूर्ण….

कोलंबो : भारत पाक क्रिकेट मॅचच्या दरम्यान केएल राहुल आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर राहुल आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. राहुल आणि विराट कोहली यांनी दमदार शतके झळकावली. तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके ठोकली. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात 2 विकेटच्या मोबदल्यात 356 धावांचा डोंगर उभारला. याच बरोबर कोहलीने आज सचिनचा विक्रम मोडीत काढून 13 हजार धावांचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला.
दरम्यान विराट कोहली 122 तर केएल राहुल 111 धावांवर नाबाद होते. पाकिस्तानची गोलंदाजी भारताच्या फलंदाजापुढे फिकी पडली.
सध्या कोलंबोत बरसणाऱ्या तुफान पावसाच्या एन्ट्रीने खेळ थांबवला असून पाकिस्तानचा स्कोअर 11 षटकानंतर दोन बाद 44 धावा असा आहे.
विराटची विराट खेळी, 13 हजार धावा पूर्ण
कोलंबोमध्ये विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला असूनलागोपाठ चौथे शतक ठोकले आहे. कोलंबोमध्ये पावसाने बॅटिंग थांबवल्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराट कोहलीने वादळी फलंदाजी करत शतक ठोकले. विशेष म्हणजे विराट कोहलीने वनडेमध्ये सर्वात वेगवान 13 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहलीने आजच्या नाबाद 122 धावांच्या खेळीसह अनेक विक्रम नावावर केले आहेत.
विराट कोहलीने मोडला सचिनचा विक्रम
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 13 हजार धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीने केला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. पाकिस्तानविरोधात 98 धावा करताच विराट कोहलीने 13 हजार धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीने 267 व्या डावात 13 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 13 हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी सचिन तेंडुलकर याला 321 डाव लागले होते. विराट कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकर, कुमार संगाकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसुर्या यांनी वनडे क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा पल्ला पार केला आहे.
विराट कोहलीचे 47 वे शतक
याशिवाय विराट कोहलीने याने वनडे क्रिकेटमधील 47 वे शतक ठोकले. विराट कोहली याने सर्वात वेगवान 47 शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे. विराट कोहलीच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकर याने 452 डावात 49 शतके ठोकली आहेत. विराट कोहली पुढील काही दिवसात हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
विराट-केएलची जोरदार खेळी
शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागिदारी करत पाया रचला. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दमदार फलंदाजी केली. दोघांनी 194 चेंडूमध्ये 233 धावांची भागिदारी केली. विराट कोहली याने 94 चेंडूमध्ये नाबाद 122 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये विराट कोहलीने 9 चौकार आणि तीन षटकार ठोकले. तर केएल राहुल याने 106 चेंडूत 111 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार ठोकले.