Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

LiveUpdate | मराठा आरक्षण आंदोलन | जालना हिंसाचार प्रकरणी कारवाई, 360 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा

Spread the love

Live GIF - Live - Discover & Share GIFs | मराठा आरक्षण आंदोलन 

 


उद्धव ठाकरेंनी घेतली आंदोलकर्त्यांची भेट
उद्धव ठाकरे यांनी जालन्यात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केली. ‘मविआच्या काळात कधीही ‘लाठीचार्ज’ झाला नाही,असे ते म्हणाले. दरम्यान केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा. अन्याय होत असूनही मराठा समाजाने शांततेत मूक मोर्चा काढले होते. तरीही माता-भगिनींवर लाठीमार करण्यात आला. या निर्घृणपणाचा हिशेब विचारणार आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली.

उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण थोड्याच वेळात जालन्यात पोहचणार…

जालना येथील घटनेचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. उद्या मुंबईतील दादर येथे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिली.

 

 

मोबाइल चित्रिकरणात स्पष्ट दिसतंय. लोक बसलेले असताना पोलीस दलाचे प्रतिनिधी येतात आणि काही वेळाने लाठीमार करतात. पोलिसांवर हल्ला झाला असं दिसत नाही.

पोलिसांनी लाठीमार केला असं दिसतंय. मी पोलिसांना दोष देत नाही, ते त्यांचं काम आहे. मात्र या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

 

 

जालना हिंसाचार प्रकरणी कारवाई, 360 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा

अकोला शहरातील जुने शहर आणि नवीन शहराला जोडणाऱ्या अत्यंत रहदारीच्या पुलावर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळं दोन्ही दिशेकडील वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यावर दगडफेक

राज्य सरकारसोबत बोलणं झाले असेल, त्यातून समाधान होत असेल तर आंदोलन थांबवण्याबाबत विचार करा, अशा सूचना मनोज जरांगे पाटील यांना दिल्याचे शरद पवार म्हणाले. आंदोलनाबाबत आस्था कमी होणार नाही, याकडे लक्ष द्या, अशा सूचना दिल्याचे शरद पवार म्हणाले.

जालन्यात आंदोलकांची आक्रमक भूमिका

  • जालन्यातील रस्ता रोकोला हिंसक वळण

  • जालन्यात आंदोलकांची आक्रमक भूमिका,अंबड चौफुली ते इंदेवाडी गाड्यांची जाळपोळ

  • अंबड चौफुली ते इंदेवाडी दरम्यान काही गाड्या जाळल्याचे वृत्त आहे.

 

आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू ठेवावे असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली असून ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांना निलंबित करण्यात यावे, असेही ते म्हणाले.

 

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर : मराठा आरक्षण आंदोलनात चुकीचे लोक सामील झाले आहेत. त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचे षडयंत्र केले जात आहे. असा आरोप माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यात केला.

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले जालन्यात उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. अंतरवालीतील सराटीत त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घतेली.

जालना – शरद पवार अंबडमधील जिल्हा रुग्णालयात दाखल, जखमी आंदोलकांची केली विचारपूस, आंदोलकांनी पवारांसोमोर मांडल्या व्यथा

मराठा आरक्षण आंदोलनावर बोलण्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांचा नकार, चंद्रकांत पाटील हे शासनाच्या मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष असून या विषयी चंद्रकांत पाटील यांचे मौन.

सोलापूर – महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरुच आहेत, लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सरकारवर हल्लाबोल केला जात आहे, या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून खबरदारी घेतली असून, सोलापूरहून जालना, बीड, लातूर औरंगाबादकडे जाणाऱ्या ११० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध करत फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी स्वत:ची चारचाकी कार पाल फाटा येथे जाळुन निषेध केला.

छत्रपती संभाजीनगर- मराठा आंदोलन लाठीचार्ज प्रकरणी मराठा समाज आक्रमक, शहरात जागोजागी आंदोलन सुरू, सिडको जालना रोड अडवून मराठा समाजाकडून निषेध व्यक्त, सिडको रोडवर लागल्या भावनांच्या रांगाच रांगा, मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिरडी काढून केला निषेध व्यक्त, मराठा आंदोलन लाठीचार्ज प्रकरणाचे संभाजी नगरात पडसाद.

जालन्यामध्ये सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषण स्थळी झालेल्या लाठीचार्ज आणि दगडफेक घटनेचे पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये उमटले, घटनेनंतर मध्यरात्री सिडको बस स्थानकामध्ये असलेली एस टी महामंडळाची बस पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये बस जळून खाक झाली आहे.

 

India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live : पावसामुळे खेळ लांबला … भारताची फालंदाजी , १५/०


Live Mahanayak news

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!