World Cup वेळापत्रकात पुन्हा कोणताही बदल होणार नाही

भारतामधील होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup) पुन्हा बदल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती, मात्र वर्ल्ड कप वेळापत्रकामध्ये कोणताही बदल होणार नसल्यास बीसीसीआयने स्पष्ट झाले आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यावर हैदराबादमधील सामन्यांची जबाबदारी असून त्यांनीच वर्ल्ड कपचे वेळापत्रक (World Cup Schedule) बदलले जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
बीसीसीआयला पुन्हा एकदा वर्ल्ड कपचे वेळापत्रक बदलावा लागले असते तर त्यांच्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असती. त्यामुळे बीसीसीआयसाठी ही सर्वात दिलासादायक गोष्ट आहे.
९ ऑक्टोबरला हैदराबादच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्ध नेटरलँड्स यांच्यात सामना होणार असून १० ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील लढत होणार आहे. सलग दोन दिवसांमध्ये दोन सामने कसे खेळवायचे, असा प्रश्न हैदराबादच्या क्रिकेट संघटनेने विचारला होता. त्यासाठी या संघटनेने वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात बदल करायला हवा, असे बीसीसीआयला सांगितले होते.
हैदराबादच्या क्रिकेट संघटनेने बीसीसीआयला सांगितले होते की, ” या दोन सामन्यांचा सुरक्षेचा प्रश्न सुटेल, मैदानाचे काय. बीसीसीआयने वर्ल्ड कप कार्यक्रमात बदल न करण्याचे ठरवल्यास राज्यातून अतिरिक्त पोलिस मागवण्याचा विचार झाला आहे. त्याचबरोबर खासगी सुरक्षा रक्षकांचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. मात्र, ९ ऑक्टोबरला न्यूझीलंड-नेदरलँड्स लढत असताना सामन्यापूर्वीचा सराव पाकिस्तान आणि श्रीलंका संघ कसा करू शकतील, अशी विचारणा केली”
तसेच, वर्ल्ड कप स्पर्धा कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही. हैदराबाद येथील सामन्यांच्या आयोजनाची जबाबदारी माझ्यावर आहे. तेथील प्रश्न सोडवण्यात येतील. सामन्यांच्या तारखा बदलण्याचा निर्णय केवळ बीसीसीआय घेत नसून, त्यात आयसीसी आणि सामने खेळणाऱ्या संघांचाही सहभाग असतो, असे हैदराबादमधील सामन्याची जबाबदारी घेणाऱ्या राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, हैदराबाद संघटनेतील अधिकारी सांगत होते कि, वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच मैदानावर लागोपाठ दोन दिवस सामने होणे योग्य नसल्याने बीसीसीआयने याबाबत विचार केला करायला हवा.
दरम्यान, हे दोन्ही सामने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था केल्या जातील, असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले आहे.
AccidentNewsUpdate : भीषण अपघातात न्यायाधीशासह चालक ठार
Live Mahanayak news
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055