Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : अंगावर ट्रक घालण्याचा काँग्रेस आमदाराचा आरोप

Spread the love

मुंबई : काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार राजेश राठोड यांनी आपल्यावर नाशिक-पुणे मार्गावर राजेश राठोड यांच्या वाहनावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप केला आहे. ते मुंबईहून जालन्याकडे चालले होते. त्यावेळी त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. वेल्हे ते पिंपळनेर भिवंडी हद्दीत ही घटना घडली. राजेश राठोड यांनी व्हिडीओ प्रसारित करुन ही माहिती दिली. राजपूत भामटा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण राजेश राठोड यांनी लावून धरले होते. राजेश राठोड यांना करणी सेनेकडून काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती.

“मुंबई येथून नाशिकमार्गे औरंगाबाद-जालना प्रवासाला सुरुवात केली. वेल्हे ते पिंपळनेर दरमयान ट्रॅफीक जाम असतं. वाहनामध्ये असताना, एका मोठा टँकर ट्रक त्याचा नंबर संबंधित पोलिसांना देणार आहे. अचानक भरधाव ट्रक माझ्या गाडीवर चालून आला. पाच ते सहा मिनिटाचा पाठलाग करुन गाडी आडवी लावून उभी केली. तेव्हा समजलं की, तो साधा प्रवास करणारा ट्रक नव्हता. त्याच्या बोलण्यातून शंका आली.

गेल्या काही दिवसापासून धमक्या येत आहेत. मला घातपाताची शक्यता वाटते. पोलीस, सरकार, गृहविभागाने ताताडीने चौकशी करावी, याची अधिकची माहिती मी द्यायला तयार आहे, सरकारने तातडीने उपायोजना करणं आवश्यक आहे” असं आमदार राजेश राठोड म्हणाले. त्यांच्याकडे पोलीस संरक्षण होतं. धमकी आल्यानंतर आमदार राजेश राठोड यांनी पोलीस सुरक्षा देण्यात आली होती. राजेश राठोड हे काँग्रेसचे युवा आमदार आहेत. ते जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. एनएसयूआयपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!