Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : देशातील २४ विरोधी पक्ष नेत्यांची कर्नाटकात आजपासून दोन दिवसीय बैठक ,कोण कोण राहणार उपास्थित ?

Spread the love

बंगळुरू : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या बंगळुरूमध्ये भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्यासाठी देशातील २४ विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत अनेक मोठे मुद्दे मांडले जाऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूच्या ताज वेस्ट एंड हॉटेलमध्ये होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत विरोधी आघाडीचे नवीन नाव, संयोजक, विरोधी गटाचे सर्व कार्यक्रम, जागा वाटपासाठी समित्यांची स्थापना आणि ईव्हीएम बद्दलच्या आक्षेपांसंदर्भात निवडणूक आयोगाकडून अपेक्षित असणाऱ्या सुधारणा यावर या बैठकीत चर्चा होईल.

केंद्र सरकारला घेरण्याची तयारी

याशिवाय दिल्लीतील अध्यादेश, यूसीसी, महागाई, परराष्ट्र धोरण, बेरोजगारी आणि इतर मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरण्याची रणनीती यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. बेंगळुरू सभेसाठी निमंत्रित पक्षांची संख्या २४ झाली आहे. त्यात आणखी वाढ करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए आणि विरोधी पक्षांच्या वतीने अधिकाधिक समविचारी पक्षांना आपल्या आघाडीत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षांच्या बैठकीला टक्कर देण्यासाठी एनडीएचीही १८ जुलै रोजी दिल्लीत बैठक होणार आहे.

तत्पूर्वी पाटणा येथे बैठक झाली

यापूर्वी २३ जून रोजी पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची बैठक झाली होती. या बैठकीत १५ विरोधी पक्ष सहभागी झाले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारच्या विरोधात लोकसभा निवडणुकीपूर्वी जोरदार विरोधक तयार करणे हा या बैठकीचा उद्देश होता. मात्र नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिली बैठक विरोधी पक्षांचे धोरण ठरवण्याच्या दृष्टीने तशी अनिर्णितच होती. बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांमध्ये काही मुद्यांवर एकमत होऊ शकले नव्हते या पार्श्वभूमीवर १७ आणि १८ जुलै रोजी होणारी बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

दोन दिवसीय बैठकीकडे सर्वांचं लक्ष

या बैठकीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे विरोधकांच्या बैठकीचा भाग असलेल्या बंगळुरूतील डिनरला शरद पवार आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी विरोधकांच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त आहे. मात्र, १८ जुलै रोजी होणाऱ्या चर्चेत ममता बॅनर्जी सहभागी होणार आहेत.नुकत्याच झालेल्या गुडघ्याच्या मायक्रोसर्जरीनंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.तर शरद पवार आज १७ जुलै रोजी मुंबईत आपल्या आमदारांची भेट घेणार आहेत.

या नेत्यांचा बैठकीत असेल सहभाग

1. काँग्रेस : सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाळ
2. टीएमसी: ममता बनर्जी, अभिषेक बनर्जी
3. सीपीआई: डी राजा
4. सीपीआईएम: सीताराम येचुरी
5. एनसीपी: शरद पवार, जितेंद्र आव्हाड, सुप्रीया सुळे
6. जदयू: नितीश कुमार, ललन सिंह, संजय झा
7. डीएमके: एमके स्टालिन, टी. आर बालू
8. आम आदमी पार्टी: अरविंद केजरीवाल
9. झारखंड मुक्ति मोर्चा: हेमंत सोरेन
10. शिवसेना (UBT): उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत
11. आरजेडी: लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, मनोज झा, संजय यादव
12. समाजवादी पार्टी: अखिलेश यादव, राम गोपाल यादव, जावेद अली खान, लाल जी वर्मा, राम अचल राजभर, आशिष यादव
13. जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फ्रस: उमर अब्दुल्ला
14. पीडीपी: महबूबा मुफ्ती
15. सीपीआई (ML): दीपांकर भट्टाचार्य
16. आरएलडी: जयंत सिंह चौधरी
17. इंडियन यूनियन मुस्लिम लीग: केएम कादर मोहिदीन आणि पीके कुणाली कुट्टी
18. केरळ काँग्रेस (M): जोश के मणि
19. एमडीएमके: थिरु वाइको, जी रेणुगादेवी
20. वीसीके: थिरु थिरुमावालवन, रवि कुमार
21. आरएसपी: एनके प्रेमचंद्रन
22. केरला काँग्रेस: पीजे जोसेफ, फ्रांसेस जॉर्ज के
23. केएमडीके: थिरु ई.आर ईस्वरम, एकेपी चिनराज
24. एआईएफबी: जी देवराजन

आपलं सरकार

Click to listen highlighted text!