JalnaNewsUpdate : अपघाताचा बनाव करून पत्नीला पेटवणाऱ्या पाटील पोलीस कोठडी

जालना : मूलबाळ होत नाही आणि घटस्फोट देत नाही या कारणावरून अपघातात कारला आग लागल्याचा बनाव करून पत्नीला जिवंत जाळल्याप्रकरणी पतीविरुद्ध २८ जून रोजी रात्री उशिरा मंठा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल सोळंके (काऱ्हाळा, ता. परतूर) असे आरोपी पतीचे नाव आहे. २९ जून रोजी या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तळणी – मंठा रोडवर २४ जून रोजी एका टेम्पोने कारला धडक दिली. अपघात झाल्यानंतर अमोल सोळंके हा वाहनचालकाला बोलण्यासाठी गेला असता, कार लॉक होऊन अचानक आग लागली. या आगीत पत्नी सविता सोळंके (३०) हिचा मृत्यू झाला असा बनाव केला, परंतु हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आल्याने मृत विवाहितेचा भाऊ बळीराम जाधव (स्वामी विवेकानंदनगर, माजलगाव, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अमोल सोळुंके याला ताब्यात घेऊन शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांचा पीसीआर सुनावण्यात आला आहे.