JalnaNewsUpdate : धक्कादायक : मूल होत नाही म्हणून त्यानेच पत्नीला पेटवले पण बनाव अपघाताचा केला …

जालना : देव दर्शनावरून परतताना कार अपघातात कारला लागलेल्या आगीत पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याचा बनाव पाटीनेच केला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये पाच दिवसांनंतर हहे सत्य मोर आले आहे . मूल होत नसल्याच्या रागातून तो पत्नीला घटस्फोट देण्यासाठी भाग पाडत होता मात्र पत्नी आपल्या मतावर ठाम असून ती घटस्फोट देत नाही हे पाहून त्याने संतापाने पत्नीलाच जिवंत जाळले.
२४ जून रोजी तळणी-मंठा रोडवर कारला आग लागून पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव तिच्या पतीने केला होता. सविता अमोल सोळंखे असं मयत झालेल्या महिलेचं नाव असून दोघांचं लग्न होऊन तेरा वर्ष झाली होती. त्यांना मुलबाळ होत नव्हते , अमोल त्या कारणावरून सविताला मारहाण करून शारिरीक व मानसिक त्रास देत असे. त्यातूनच वारंवार अमोल सविला घटस्फोट दे अशी मागणी करत असे मात्र त्याला सविता नकार देत होती.
याचाच राग मनात धरून पती अमोलनं पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल. अपघाताचा बनाव करून कारला आग लागल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली..दरम्यान पोलिसांनी पाच दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास चालू आहे.