Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

JalnaNewsUpdate : मोठी बातमी : जालना शहर झाले आता महापालिकेचे शहर

Spread the love

मराठवाड्याची मोठी व्यापार पेठ , स्टील आणि बियाणांचे शहर अशी ओळख असलेल्या जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होत असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे जालना आता राज्यातील २९ वी महापालिका होणार आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जालना नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू होत्या. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर सरकारने जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत करण्याचे आदेश काढले आहे. दरम्यान राज्यात शिंदे सरकार येताच राज्याच्या उपसचिव विद्या हपय्या यांनी जालना जिल्हाधिकारी यांना नगरपालिकांचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यासाठीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शिंदे गटाचे माजी मंत्री अर्जुन यांनी जालना पालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यासाठी वर्षभरापूर्वी पाठपुरावा केला होता. नगर विकास उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. नगरपालिकेची महानगरपालिका करताना तुर्तास हद्दवाढ न करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरु होती. दोन तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या वतीने जालना महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे. जालन्याची स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळख आहे. तर मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून देखील जालना शहराची राज्यभरात ओळख आहे. त्यात वाढती लोकसंख्या पाहता आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने जालना महानगरपालिका घोषित करावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती. दरम्यान आता या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांचा मात्र या प्रस्तावाला विरोध होता.

#जालना महापालिका

WorldNewsUpdate : इम्रान खानच्या अटकेमुळे पाकिस्तानात गृहयुद्धासारखी स्थिती , देशभरात १४४ कलम लागू


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

आपलं सरकार

Click to listen highlighted text!