Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Live Updates : संभाजीनगरमध्ये सांस्कृतिक मंडळ मैदानवर होणार महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा

Spread the love

Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


Live Updates : संभाजीनगर सांस्कृतिक मंडळ मैदान, महाविकास आघाडी वज्रमुठ सभा लाईव्ह

महाविकास आघाडीची पहिली सभा आज संध्याकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये सांस्कृतिक मंडळ मैदानवर होणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ही सभा होत आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षाचे नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सभेसाठी तब्बल एक हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त राहणार असून शहरात दोन डीआयजी सह तीन आयपीएस अधिकारी ४ डीसीपी, ३ एसीपी, २० पोलीस निरीक्षक, २५ पोलीस उपनिरीक्षक तैनात राहणार आहे. तर शहरात एक रॅपिड एक्शन फोर्स आणि तीन एसरपीएफच्या तुकड्या तंतुकड्यांचा कडक बंदोबस्त राहणार आहे.

दुपारनंतर शहरातील मिल कॉर्नर ते खडकेश्वर, खडकेश्वर ते भडकल गेट आणि भडकल गेट ते पोस्ट ऑफिस असे तीन रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद राहणार आहेत. सिल्लोड फुलंब्री वरून येणाऱ्यांसाठी हर्सूल सावंगी रस्ता वापरता येणार नाही सिल्लोड फुलंब्री वरून येणाऱ्यांना केम्ब्रिज चौक जालना रोड मार्गे कर्णपुरा मैदानावर येणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


  • सभेच्या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरवात झाली असून, कार्यकर्त्यांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

 

  • सावरकरांवर प्रेम असेल तर भाजपने अहमदाबादचे नाव सावरकर नगर करून दाखवावे : सुषमा अंधारे

 

  • आमची सभा असल्याने मुद्दामहून खोडसाळपणा करण्यासाठी संध्याकाळी सावरकर गौरव यात्रा, चंद्रकांत खैरे यांचा आरोप

 


सभेला महाविकास आघाडीचे कोणते नेते उपस्थित राहणार?

 

शिवसेना – उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, खासदार बंडु जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, अनिल परब, सुनील प्रभू.

राष्ट्रवादी – अजित पवार, जयंत पाटील, धंनंजय मुंडे, राजेश टोपे, संजय बनसोडे, जयप्रकाश दांडेगावकर

कॉग्रेस – नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख

 

 

 

 

वज्रमुठ सभा वज्रमुठ सभा

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

आपलं सरकार

Click to listen highlighted text!