Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMediaNewsUpdate : मनुस्मृती जाळून त्यावर सिगारेट पेटवून चिकन शिजवणारी प्रिया दास आहे तरी कोण ? आणि तिने हे का केले ?

Spread the love

देशातील सोशल मीडियावर सध्या  मनुस्मृति पेटवणाऱ्या आणि चिकन शिजवणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे त्यानंतर आपण हे का केले याचा खुलासा तिने स्वतः केला आहे .  मनुस्मृतीचे दहन करणारी प्रिया दास ही बिहारमधील शेखपुरा येथील रहिवासी आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यावर यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. यानंतर इंडिया टुडेने प्रिया दासशी संवाद साधला तेंव्हा तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे आपण धूम्रपान करीत नाही आणि नॉनव्हेजही खात नसल्याचे म्हटले आहे. 


कोण आहे प्रिया दास

शेखपुरा, बिहारची प्रिया २७ वर्षांची आहे. प्रिया शिक्षण घेत आहे आणि शिक्षिका बनण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियाने सीटीईटी पास केली असून पीएचडी करत असल्याचे सांगितले जात आहे. राजकारणातही ती  सक्रिय आहे. प्रिया लालू प्रसाद यादव यांच्या पक्ष आरजेडीशी संबंधित असून ती  पक्षाच्या महिला सेलची  प्रदेश सचिव आहे.

मनुस्मृती का जाळली?

प्रिया दास यांनी सांगितले की, तिने मनुस्मृती सुमारे ५०० रुपयांना विकत घेतली होती. त्यांनी सांगितले की, मनुस्मृतीमध्ये असे लिहिले आहे की जर एखाद्या महिलेने दारू प्यायली तर तिला अनेक प्रकारे शिक्षा होऊ शकते. तसेच न्याय करण्याआधी संबंधितांची जात जाणून घेण्याचेही लिहिले आहे.

‘मी नॉनव्हेज खात नाही, धूम्रपान करत नाही’

मनुस्मृती जाळणे , सिगारेट ओढणे आणि चिकन शिजवण्याचा व्हिडिओ ट्विटरवर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. मनुस्मृती जाळणे चुकीचे असल्याचे शेकडो लोकांनी म्हटले आहे. मात्र, असे अनेक लोक आहेत ज्यांनी प्रियाच्या स्मोकिंगला आणि चिकन शिजवण्यालाही विरोध केला आहे. इंडिया टुडेशी बोलताना प्रिया दास म्हणाली की, मी नॉनव्हेज खात नाही आणि सिगारेटही ओढत नाही. केवळ निषेध म्हणून व्हिडिओमध्ये आपण चिकन शिजवले आणि सिगारेट ओढली तसेच मनुस्मृतीचे दहन केल्याचे सांगितले.


‘दांभिक आणि ढोंगी विचारांवर प्रहार करण्यासाठी मनुस्मृतीचे दहन’

प्रिया दास एका व्हिडिओमध्ये म्हणते आहे  की, मनुस्मृती जाळणे ही एक कृती आहे, तत्काळ घडलेली घटना आहे. बाबासाहेबांनी ही मनुस्मृती  जाळण्याचा पाया फार पूर्वीच घातला होता. मनुस्मृती जाळण्याचा उद्देश कोणाही व्यक्तीच्या विरोधात नसून अंधविश्वास , सामाजिक विषमता , दांभिकता, ढोंगीपणाच्या विचारांवर प्रहार करणे हा आहे. हेच माझे ध्येय होते. प्रिया दास म्हणाली की, ही फक्त सुरुवात आहे. असा ग्रंथ अस्तित्वात नसावा. हे पुस्तक कोणत्याही अर्थाने योग्य नाही. माणसाला कोणत्याही पुस्तकातून ज्ञान मिळते, पण भेदभाव आणि लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम हे पुस्तक करते. अशा परिस्थितीत अशा पुस्तकाला विरोध व्हायलाच हवा.

‘बाबासाहेबांनीही मनुस्मृति जाळली’

प्रिया दास म्हणाली  की, या पुस्तकात मानव आणि महिलांबद्दल अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या कोठूनही योग्य नाहीत. या पुस्तकाचे प्रत्येक पान जाळले पाहिजे. प्रिया म्हणाल्या की, दलित लोकांनी पुढे येऊन अशा पुस्तकाला विरोध केला पाहिजे. या दरम्यान प्रियाने असा दावाही केला की, समाजात पसरलेल्या सर्व वाईट गोष्टींच्या मुळामागे मनुस्मृती आहे. मग ते स्त्रियांशी संबंधित असो किंवा विवाह प्रथांशी संबंधित असो. बाबासाहेबांनीही मनुस्मृतीचे दहन केल्याचे ती म्हणते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!