Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : मोठी बातमी : शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या बाबतीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Spread the love

 नवी दिल्ली :  केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय  घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.


गेल्या आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. त्यावर  निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. याबाबत आज  निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे. तर, शिंदे गटाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

शिवेसेनेत  बंड झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा एक गट. या दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. यावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू होती. या सुनावणीवर आयोगाने आज अखेर निकाल दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे.शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पहिल्यापासून धनुष्यबाण चिन्हासाठी मागणी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगात युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली. यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे.

सुनावणी दरम्यान, दोन्ही गटाकडून कागदपत्र सादर करण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा निकाल राखून ठेवला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज हा निकाल दिला आहे. काही महिन्यातच मुंबई महापालिकेसाठी निवडणूक जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवरच आज आयोगाने चिन्हावर निर्णय दिला आहे.

निवडणूक आयोगाने ७८ पानांचा निकाल दिला आहे, या निकालात शिवसेनेचा इतिहासच बदलला गेला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्र देण्यात आली होती, पण निवडणूक आयोगाच्या निकालात आमदार आणि खासदार कुणाकडे हाच कळीचा मुद्दा ठरला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५५ पैकी ४० आमदार आणि १३ खासदार गेले, याशिवाय प्रतिनिधीसभेतही बहुमत आपल्या बाजूने आहे, असा दावा शिंदेंकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आला होता.

शिवसेना पुन्हा उभी करू : संजय राऊत यांची प्रतिक्रिया

‘न्याय व्यवस्था आणि तपास यंत्रणा गुलाम झाल्या आहेत, आम्ही काय करू शकतो. महाराष्ट्रामध्ये खोके सरकार आलं आहे. खालपासून वरपर्यंत पाण्यासारखा पैसा ओतला आहे. हे पाणी कुठपर्यंत पोहोचलं आहे, हे आज देशभरातल्या जनतेने बघितलं आहे. पण आम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाही. जनता आमच्यासोबत आहे. आम्ही नवीन चिन्ह घेऊन जनतेच्या दरबारात जाऊ. पुन्हा एकदा हीच शिवसेना उभी करू,’ असं संजय राऊत म्हणाले आहेत. ‘देशात लोकशाहीच राहिलेली नाही. ही लोकशाहीची हत्या आहे. आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागू,’ असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!