Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सुप्रीम कोर्टात २१ फेब्रुवारीला होणार महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी

Spread the love

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करायचे की नाही यावर सुप्रीम कोर्टने ही सुनावणी २१ फेब्रुवारीला होईल, असा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांचे प्रकरण आणि नबाम रेबियासाठी ७ सदस्यीय घटनापीठाची गरज आहे की नाही यासंदर्भातील गुणवत्तेच्या आधारावर पुढील सुनावणी होईल.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन केले. दरम्यान, ते म्हणाले कि, ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाच्या संदर्भात या अमूर्त, वेगळ्या आणि विशिष्ट बाबींचा या प्रकरणातील तथ्यांच्या बाबतीत विचारात घेतला जाऊ शकत नाही. नबाम रेबियामध्ये जी तत्त्व निश्चित करण्यात आली त्याचा सध्याच्या प्रकरणात वास्तविक स्थितीत परिणाम होतो की नाही याच्यावर विचार करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर नबाम रेबियातील निर्णयाचा संदर्भ मोठ्या खंडपीठाकडे देणे योग्य की अयोग्य हा मुद्दा या प्रकरणाच्या गुणवत्तेवर निश्चित केला जाईल. यामुळे घटनापीठाची सुनावणी २१ फेब्रुवारीला गुणवत्तेच्या आधारावर असेल, असेही सरन्यायाधीश सांगलीतले.

शिवसेना आणि महाविकास आघाडीच्यावतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला होता. कपिल सिब्बल यांनी विविध निकालांचा दाखला देत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात नबाम रेबियाच्या निकालावर फेरविचार करण्यासाठी ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी केली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टात अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या २७ आणि २९ जूनच्या निकालावर देखील भाष्य केले होते. तसेच, या एकनाथ शिंदे यांच्यासाठी हरीश साळवे आणि एन. के. कौल यांनी युक्तिवाद केला. ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी, मनिंदर सिंग आणि सिद्धार्थ भटनागर यांनी देखील युक्तिवाद केला.सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्यपालांच्यावतीने युक्तिवाद केला. या सर्वांनी नबाम रेबिया निर्णयाच्या अचुकतेबाबत फेरविचार करण्याची गरज नाही, असा युक्तिवाद केला होता.

 

IndiaNewsUpdate : संघप्रणीत पांचजन्यचे धाडस, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर केला असा प्रहार !!


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

 


LET US BE YOUR SOCIAL MEDIA MANAGER-

We can keep your business connected by managing and updating your pages to help engage with your target audience and increase you public awareness of your business through proper management.

For More details WhatsApp on: 9420379055


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!