नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा पिठाच्या भांड्यात पडल्याने मृत्यू
कोल्हापुर येथील करवीर तालुक्यातील वडणगे तालुक्यात नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन पिठाच्या भांड्यात पडल्याने जीव गमवला आहे. ही घटना काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. दुर्घटना घडताच चिमुकल्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. मात्र, नाका-तोंडात पीठ गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं. यामुळे
कृष्णराज राजाराम यमगर (वय ९ महिने, रा.जुना वाशीनाका) असे या चिमुकल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी माहिती नुसार, कोल्हापुरातील जुना वाशीनाका येथे राहणाऱ्या सुप्रिया राजाराम यमगर या कृष्णराजला घेऊन करवीर तालुक्यातील वडणगे येथे आपल्या आजीकडे आल्या होत्या. दरम्यान, काल संध्याकाळच्या सुमारास कृष्णराज वॉकरमधून चालत खेळत होता. मात्र, चालता-चालता त्याचा गव्हाच्या पिठाच्या भांड्यात तोल गेला आणि तो त्यात पडला.
भांड्यामध्ये पीठ जास्त प्रमाणात असल्याने कृष्णराजच्या तोंडात आणि नाकात गव्हाचे पीठ जाऊन चिकटून बसले. दरम्यान, आजीने त्याला त्वरित त्या भांड्यातून बाहेर काढले आणि नाका तोंडात पीट गेल्याचे लक्षात येताच त्याला कुटुंबीयांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, दवाखान्यात नेण्यापूर्वीच चिमुकल्याचा तोंडात-नाकात पीठ चिटकल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055