Live Updates : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकाल, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे चौथ्यांदा विजयी ….
राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज, गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली आहे. पहिल्या पसंतीचा कल पुढे येण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
-
निकालाच्या आधी पुण्यात आणि संगमनेर येथे सत्यजित तांबेंच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले. बॅनरची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू.
-
तीन जागांवर महाविकासची आघाडी
नागपूर, अमरावती, औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीची आघाडी
-
EVM पेक्षा बॅलेटवर भाजप जिंकू शकते- अमोल मिटकरी
कोकण पदवीधर मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून आले प्रथम त्यांचे अभिनंदन. EVM पेक्षा बॅलेट वर सुद्धा भाजप निवडणूक जिंकू शकते हे सिद्ध झाले. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका भाजपाने EVM ऐवजी बॅलेट वर घेण्याचे औदार्य दाखवावे.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 2, 2023
नाशिक मतदारसंघ:
- एकूण मतदान – १ लाख २९ हजार ४५६. एकूण मोजलेले मतदान ८४०००सत्यजित सुधीर तांबे : ४५६६०शुभांगी भास्कर पाटील : २४९२७
सत्यजीत तांबे विजयाच्या उंबरठ्यावर. तांबे यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु. कार्यकर्त्यांनी पेढा भरवून केला जल्लोष.
- नाशिकमध्ये मतमोजणीची तिसरी फेरी सुरु आतापर्यंत सत्यजित तांबे आघाडीवर
- सत्यजित तांबे आघाडीवर असल्याचे कळताच मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
- नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक, पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे आघाडीवर
- नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणीची पहिली फेरी अंतिम टप्यात, मागील दीड तासापासून सुरू आहे पहिली फेरी.
- एकूण 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून खरी लढत शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात आहे.
- शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात लढत सुरूच
कोकण मतदारसंघ उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
- महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची तब्बल ६ हजार मतांची आघाडी, म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची १८ हजारांपेक्षा जास्त मतं
नागपूर मतदारसंघ: सुधाकर अडबाले विजयी
- नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे सुधाकर आडबले १४ हजारांहून मते मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. भाजपचे नागो गाणार यांना ६ हजार मते मिळाली आहेत.
- पहिल्या फेरी अखेरीस विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले सुधाकर अडबाले ७,७०३ मतांनी पुढे
- नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ पहिली फेरी अधिकृत आकडे ( २८ हजार मतांपैकी )सुधाकर अडबाले – १४०६९
नागो गाणार – ६३६६
राजेंद्र झाडे – २७४२
सतीश इटकेलवार – ६०अवैध मते – १०९९ - सुधाकर अडबाले यांना १४ हजार ७१ मते मिळाली. कोटा पहिल्या पसंतीतच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीच्या मतांची गणना करावी लागेल.
- नागपूरमध्ये काँग्रेसचे सुधाकर आडबाले,भाजपचे नागो गाणार आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यात तिहेरी लढत होत आहे.
- शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीमध्ये आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार ७५० मते अवैध ठरली.
- पहिल्या फेरीतील अजून ६००० मतांची मतमोजणी सुरू आहे
- नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी झालेल्या निवडणूकीसाठी एकूण 34,360 मतदान झाले. यापैकी 28,000 मतांची पहिली फेरी दोन तासांनंतर पूर्ण होईल जी निर्णायक ठरणार आहे.
औरंगाबाद मतदारसंघ विक्रम काळे विजयी
-
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विक्रम काळे चौथ्यांदा विजयी. त्यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव केला आहे.
- १२ व्या फेरी अखेर विक्रम काळे : २११०२, किरण पाटील १४,१८२ , सूर्यकांत संग्राम १४,१२८
- मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीला सुरवात झाली आहे. निकाल हाती येण्यासाठी रात्री १० वाजण्याची शक्यता
- दुसऱ्या पसंतीच्या पाच फेऱ्यांत विक्रम काळे आघाडीवरपाच फेऱ्यांत विक्रम काळे यांना मिळाली १३ मते तर किरण पाटील यांना मिळाले ८ मते मिळाली. दुसऱ्या पसंतीच्या ९ फेऱ्या बाकी आहेत
- औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांनी भाजपच्या किरण पाटील यांच्यावर आघाडी घेतली. काळे यांना १९ हजारहून अधिक मतं मिळाली आहेत.
- औरंगाबादमध्ये मविआचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर आहेत. भाजपचे किरण पाटील सध्या पिछाडीवर आहेत.
- मराठवाडा शिक्षक मतदारसंघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार किरण पाटील मात्र पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
अमरावती मतदारसंघ:
-
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचा निकाल हाती; महाआघाडीचे धीरज लिंगडे 3382 मतांनी विजयी
- अमरावती निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झालेल्या ७५३५ मतांची फेरतपासणी होणार आहे
- दुसऱ्या फेरीतही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिगांडे १६०० मतांनी पुढे भाजपाचे विद्यमान आमदार रणजित पाटील दुसऱ्या फेरीतही पिछाडीवर आता काही वेळातच तिसऱ्या फेरीला होणार सुरुवात.
- अमरावतीमध्ये भाजपचे नेते आणि विद्यमान आमदार रणजीत पाटील अद्याप पिछाडीवर, महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055