भाजपचा बालेकिल्ला, नागपूर मतदार संघात मविआचे उमेदवार विजयी
नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झाले आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर मतदार संघात भाजपचे १२ वर्ष आमदार असलेल्या नागो गाणार यांचा पराभव झाला आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली आहे. सुधाकर आडबाले १६ हजार ५०० मतांनी विजयी झाले आहेत. या निवडणूकीत ३४ हजार ३६० पत्रिकांपैखी २८ हजार मतमोजणीत पहिल्या पसंतीच्या मतामधील एक हजार ९९ मते अवैध ठरली तर २६ हजार ९०१ मते वैध होती. २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी १९ जणांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.
Live Updates : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकाल
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055