Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक मुंबईत २० महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार; ३५ वर्षी व्यक्तीला अटक

Spread the love

मुंबईतील वरळी परिसरात २० महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. वरळी पोलीस स्थानकात चिमुकलीच्या आईने तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३५ वर्षी व्यक्तीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मुंबईतील वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि पीडित मुलगी दोघेही एकाच परिसरातील रहिवासी आहेत. मुलीची आई काही काळासाठी घराबाहेर गेली होती, तेव्हा आरोपीने चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहिले आणि तिला आपल्या घरी आला. तिथेच त्याने चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर मुलीला त्याने पुन्हा तिच्या घराबाहेर सोडले.

घरी आल्यानंतर मुलगी खूप रडत होती, तिला आईला सांगताही येत नव्हते. आईलाही काही कळत नव्हते. काही काळाने आईला काहीतरी अनुचित प्रकार घडत असल्याचा संशय आला. मुलीची आई तात्काळ मुलीला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली. त्यावेळी चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. पीडितेच्या आईने तात्काळ पोलीस स्थानकात जाऊन नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे वरळी पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चिमुकलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ३५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 

 

शेळ्या चरण्यासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!