बोनेटमध्ये अडकलेल्या वृद्धाचा मृत्य, ८ कि.मी ओढून त्याच्यावर चढवली कार…

दिल्लीच्या कांजवालासारखी घटना बिहारमध्ये समोर आली आहे या घटनेत एका ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका भरधाव कारने एका वृद्धाला धडक दिली. यानंतर कारचालकाने बोनेटमध्ये अडकलेल्या वृद्धाला सुमारे ८ किमीपर्यंत ओढत नेले. आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.
ही घटना शुक्रवारी (२० जानेवारी) सायंकाळी पूर्व चंपारण जिल्ह्यात घडली. ७० वर्षीय शंकर चौधरी असे या वृद्धाचे नाव असून तो बांगारा गावातील रहिवासी होता. अपघातादरम्यान, तो त्यांच्या सायकलवरून NH-28 वर कोटवाजवळ बांगारा रोड ओलांडत होते. त्याचवेळी एका भरधाव कारने त्याला धडक दिली, कारचालकाने बोनेटमध्ये अडकलेल्या शंकर चौधरीला ८ किमीपर्यंत ओढत नेले तत्पूर्वी, चालकाने ब्रेक लावला आणि शंकर चौधरीला रस्त्यावर पडून गाडी खाली चिरडले त्यात त्या मृत्यू झाला. त्यानंतर कारचालक पिप्रकोठीजवळ कार सोडून पळून गेला. दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, वृद्धाने थांबण्याची विनंती करूनही ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही. शंकर चौधरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मोतिहारी सदर रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी अधिक तपस सुरू केला आहे.
कोण शाहरुख खान? विचारणाऱ्या मुख्यमंत्र्यांना स्वतः अभिनेत्यानेच केला फोन
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055