Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोण शाहरुख खान? विचारणाऱ्या मुख्यमंत्र्यांना स्वतः अभिनेत्यानेच केला फोन

Spread the love

सुपरस्टार शाहरुख खानने पठाण चित्रपटाचा विरोधाच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना रात्री फोन केला. मुख्यमंत्र्यांनी एका दिवसापूर्वीच या चित्रपटाबाबत विचारले असतांना ते म्हणाले होते की ते शाहरुख खानला ओळखत नाही. तसेच चित्रपट पाहण्यासही त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. अशातच शाहरुख खानकडून हा फोन आला असून त्याने मुख्यमंत्र्यांना फोन करून चित्रपटाविरोधात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने पहाटे २ वाजता मला फोन केला. यादरम्यान, त्यांनी आगामी चित्रपट ‘पठाण’ या विरोधात राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या निदर्शनेबद्दल चिंता व्यक्त केली. दरम्यान, त्यांनी शारुख खान यांना आश्वासन दिले आहे की ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी राज्य सरकार घेईल.

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाबाबत देशभरात निदर्शने सुरू आहेत. आसाममधील अनेक शहरांमध्ये देखील या चित्रपटाविरोधात निदर्शने सुरू आहेत. बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी गुवाहाटी येथील नारेंगी येथे एका सिनेमागृहाची तोडफोडही केली होती. यावेळी चित्रपटाचे पोस्टरही जाळून या निदर्शनाला हिंसक वळण दिले.

कायदा व सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच यापुढे असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची देखील काळजी घेतली जाईल. काल पठाणच्या स्क्रिनिंगला विरोध करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले होते की शाहरुख खान कोण आहे? आपण काळजी का करावी? आपल्याकडे आधीच खूप शाहरुख खान आहेत? ‘पठाण’ नावाचा कुठलाही चित्रपटा विषयी मी ऐकलं नाही आणि त्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, असेही ते म्हणले होते.

 

ज्येष्ठ नेते मोरेश्वरराव टेमुर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 


ahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!