Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखर असते – एकनाथ शिंदे

Spread the love

पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६ व्या सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार जयंत पाटील, विरोधीपक्षनेते अजित पवार सगळेच एका मंचावर उपस्थित होते. दम्यान शरद पवार यांच्या तोंडी नेहमी साखर असते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचे कौतुक केले आहे.

गेल्या आठवड्यात संक्रात झाली, त्यामुळे गोड गोड बोलायचे, मीही गोड गोड बोलणार. मी नुकतेच दाओसला जाऊन आलो. कोणी काहीही म्हणो पण मी चांगली गुंतवणूक आणलेली आहे. शरद पवार यांना यासंदर्भात माहिती आहे. शरद पवार राज्याच्या हितासाठी, भल्यासाठी नेहमी मार्गदर्शन करतात. मलाही जेव्हा गरज आहे तेव्हा फोन करतात तेव्हा सूचना करतात. सहकार क्षेत्रात त्यांचे असणारे योगदान हे नाकारता येणार नाही अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगांचा नंबर लागतो. आर्थिक चक्र सक्रिय ठेवण्यात साखर उद्योगांचा मोठा हातभार लागतो. साखर उत्पादनात जगात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे ही अभिमानाची बाब आहे. साखर उद्योग वाढला पाहिजे, टिकला पाहिजे यासाठी सरकार अतिशय गांभीर्याने काम करत आहे. असंख्य शेतकरी या उद्योगावर अवलंबून आहेत म्हणूनच अठरा प्रकल्प राबवत आहोत. या क्षेत्रास शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी माणसाची गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच इथेनॉल वापराला प्राधान्य देतात. याचा साखर कारखानदारांना फायदा होईल. सहकार क्षेत्रात शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. तेच शरद पवार सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्यांचे सल्ले ऐकले पाहिजेत. त्यानुसार शेतीत किंवा उद्योगात बदल केले पाहिजे. केंद्रीय कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी त्यांनी काम केलेले आहे. शेतकऱ्यांबद्दल त्यांना आत्मियता आहे, त्यांचा गाढा अभ्यास आहे, त्यांनी नेहमी मार्गदर्शन करावे. याचा राज्याला नक्कीच फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना भेटून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी मदत करावी अशी मागणी करतो. त्यांनीही आतापर्यंत चांगली मदत केली आहे, असेही ते म्हणाले.

 

 

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकला सीटबेल्ट न लावल्याने ठोठावण्यात आला दंड


 

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!