औरंगाबाद महापालिकेतील १७८ महत्त्वाची पदे भरण्याचा निर्णय

औरंगाबाद महापालिकेतील रिक्त पदांचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. मात्र लवकरच रिक्त पद भरली जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यमान प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी अनुकंपावरील ५५ आणि आस्थापनेवरील १२३ अशी एकूण १७८ महत्त्वाची पदे भरण्याचा निर्णय घेतला असुन या प्रक्रियेसाठी शासन नियुक्त एका खाजगी एजन्सीचीही नेमणूक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनेच महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून आवश्यकतेनुसार मे २०२३ पूर्वी नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेतील विविध विभागांत ३ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. तर सध्या ९५३ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची गरज आहे. राज्य शासनाकडून मनपात प्रतिनियुक्तीवर येणारे अधिकारी त्वरित मिळावेत, यासाठीही पाठपुरावा सुरु आहे. मात्र आस्थापनेवरील कर्मचारी दरमहा निवृत्त होत असल्याने हा भार आणखी वाढत आहे. सध्या मनपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजार ७१३ एवढी झाली आहे. त्यामुळे महापालिका एक हजारापेक्षा जास्त जणांची नोकरभरती करु शकते. उपायुक्तांची सहा पदे मंजूर असून, त्यापैकी तीन पदे पदोन्नतीने भरली जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे असून, त्यापैकी एक पद पदोन्नतीने भरण्यात येणार आहे. सहायक आयुक्तांची ५० टक्के पदे पदोन्नतीने, तर २५ टक्के पदे सरळसेवा भरतीनुसार भरण्यात येणार आहेत.
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर होणार भरती
औरंगाबाद महानगरपालिकेत नोकरभरतीच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र सध्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरु असल्याने आचारसंहितामुळे भरती प्रकिया राबवता येत नाही. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यावरच ही मेगा भरती होणार आहे. तर ३० जूनला शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार असून, त्यानंतर या भरतीची जाहिरात निघण्याची शक्यता आहे. तसेच, महानगरपालिकेतील महत्त्वाचीच काही पदे सुरुवातीला भरली जाणार आहे. ज्यात वर्ग १ ते ३ मधील निवडक पदेच भरण्याचे ठरवण्यात आल्याचे वृत्त आहे. कनिष्ठ अभियंता, सहाय्यक आयुक्त, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी, लिपिक, अग्निशामक कर्मचारी यांसह इतर काही पदांचा यात समावेश असणार आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा बेरोजगार तरुणांना होणार असून, आता या भरतीकडे तरुणांचे लक्ष लागले आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकला सीटबेल्ट न लावल्याने ठोठावण्यात आला दंड
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055