जयंत पाटील निलंबित… वाचा काय आहे प्रकरण?
विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याच्या संतापात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरल्याने विधानसभेत गदारोळ झाला. त्यामुळे सत्ताधारी बाकांवरून जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर पाटील यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सभागृहात काय झाले होते?
बुधवारी, सायंकाळी लोकसभेत दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी बिहार पोलिसांच्या चौकशीचा दाखल देत आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर आज विधीमंडळ अधिवेशनातही सत्ताधाऱ्यांकडून या प्रकरणी चौकशीची मागणी केली जात होती.आक्रमक होणाऱ्या विरोधी पक्षाला विशेषत: शिवसेना ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून या प्रकरणाची चौकशीची मागणी लावून धरली. या मागणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानसभेत शाब्दिक खडाजंगी झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला होता.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी केली. ही मागणी अध्यक्षांनी फेटाळली. विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्हाला संधी दिली होती, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. त्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला. सत्ताधारी बाकावरून १४ जणांना बोलण्याची संधी दिली आणि विरोधी बाकावरून एका सदस्याला बोलण्याची संधी दिली पाहिजे अशी मागणी करण्यात येत होती. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त करत तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका, असे म्हटले आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणखीच आक्रमक झाले. यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली. सभागृहात गोंधळ वाढल्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले होते.
जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले होते. जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी सत्ताधारी बाकांवरून करण्यात आली. सभागृहातील कामकाज स्थगित करण्यात आल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत जयंत पाटील यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या विषयी विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले कि, अनेक वर्षे सभागृहात काम करतो, असे वक्तव्य अजाणतेपणाने जाऊ नये अशा विचारांचे आम्ही आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती करून मार्ग निघावा यासाठी प्रयत्न केला. सदस्यांच्या भावन तीव्र आहेत. असा शब्दप्रयोग झाला त्याबद्दल मी स्वत: दिलगिरी व्यक्त करतो. अध्यक्षांबद्दल आदराची भावना आहे, यापुढेही हीच भावना ठेवू. असे अजित पवार यांनी सांगितल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केली आहे.
असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले कि, जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबाबत अपशब्द वापरून सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली. सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला. त्यांच्या अशा वक्तव्याकडे दुर्लक्ष केल्यास चुकीचा पायंडा निर्माण होईल त्यामुळे, सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव आला आहे, असे विधानसभा अध्यक्ष म्हणाले. तसेच जयंत पाटील यांना मुंबई व नागपूर येथील विधिमंडळाच्या परिसरात बंदी घालण्यात आली आहे.
सुशांत सिंग आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची पुन्हा होणार चौकशी
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055