Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने

Spread the love

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीने कर्तबगार व निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्या ५७ वर्षांच्या असून गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुक्ता शैलेश टिळक २०१९ च्या राज्य निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून कसबा पेठेतून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. २०१७ ते २०१९ या काळात त्या पुण्याच्या महापौर होत्या. महापौर म्हणून केलेल्या कामावर खूश होऊन पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. गिरीश बापट यांच्या कसबा मतदारसंघातून त्यांनी दणक्यात विजय मिळवून विधानसभेत पाऊल ठेवले. पण त्याचवेळी त्यांनी कर्करोगाची लागण झाली. पुढे दोन ते अडीच वर्ष त्यांना कर्करोग आणि अनेक व्याधींनी ग्रासले होते. त्यामुळे सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावर अतिशय कमी झाला होता. पण रुग्णालयातून त्या लोकांची कामे करत राहिल्या, अधिकाऱ्यांना सूचना देत राहिल्या.

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, मुक्ता टिळक यांनी नगरसेवक, महापौर आणि आमदार म्हणून सक्षमपणे लोकसेवा केली. शहरातील राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक जीवनात त्या सक्रीय होत्या. त्यांना लोकमान्य टिळक यांच्या घराण्याचा वारसा लाभला होता व तो त्यांनी जबाबदारीने जपला. भारतीय जनता पार्टीचे काम करताना त्यांनी पक्षाचा ‘संगठन सर्वोपरी’, हा मंत्र जपला आणि आपल्या आचरणाने कार्यकर्त्यांसमोर उदाहरण निर्माण केले. त्यांच्या निधनाने पक्ष संघटनेची हानी झाली आहे. आपण त्यांना भाजपा, महाराष्ट्रतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो, असे मा. प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

जून महिन्यात राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक पार पडली. ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी अतिशय प्रतिष्ठेची केल्याने कर्करोगाशी झुंजत असतानाही मुक्ता टिळक अॅम्ब्युलन्सने विधीमंडळात मतदानासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना धाप लागत असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करुन देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले होते.

 

जयंत पाटील निलंबित… वाचा काय आहे प्रकरण?

 

News Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!