सुशांत सिंग आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची पुन्हा होणार चौकशी
हिवाळी अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी तिच्या घरी कोणता नेता होता याची चौकशी करण्याची मागणी करण्यात अली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिशा सालियन प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या ही केस पोलिसांकडे असून कुणाकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या गदारोळामुळे सभागृह तीन ते चार वेळा तहकूब करण्यात आले आहे.
चैथ्या दिवशी हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पोलिसांकडे केस सुरु आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे याचे पुरावे आहेत त्यांनी ते द्यावे. दिशा सालियन केस कधीही सीबीआयकडे गेली नाही. सुशांत सिंग यांची केस सीबीआयकडे होती. नविन पुरावे आले असतील तर त्यांची चौकशी केली जाईल.
दरम्यान, दिशा सालियन विषयी बोलत असतांना विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, दिशा सालियन हयात नसताना त्याबद्दल आणखी बोलून बदनाम करायचे नाही. तिच्या आई वडिलांनी हात जोडून विनंती केली, आम्हाला आता जगू द्या, दिशाला बदनाम केले जात आहे. ती आम्हाला सोडून गेली आहे. दिशा सालियनची चौकशी करायचे असेल तर पुजा चव्हाणची देखील चौकशी करा. चौकशी करायची असेल तर सर्वच चौकशी करता येईल. फक्त राजकारण करु नका.
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल केंद्राकडून मागवणार असून महाराष्ट्र पोलिस पुन्हा तपास करण्याची शक्यता आहे. दिशा सालियन मृत्यूचा मुद्दा भरत गोगावलेंकडून विधानसभेत उपस्थित करण्यात आला. मृत्यूआधी दिशासोबत कोण कोण होते? दिशाच्या मृत्यूचं गूढ कधी उकलणार? असा सवाल गोगावले यांनी सभागृहात उपस्थित केला होता.
#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055