Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Gram panchayat results Live 2022 : महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल…

Spread the love

राज्यभरातील ७ हजार १३५  ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल आहे. राज्यातल्या ३४ ठिकाणी ६१६ ग्रमपंचायत बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायत निवडणुका राजकीय चिन्हावर लढवल्या जात नसल्या, तरी स्थानिक नेत्यांसाठी निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर कोणता राजकीय पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकतोय, याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.

 

 • अहमदनगर : एकूण ग्रामपंचायत- २०३ निकाल जाहीर : २०३

  बिनविरोध : १३

  भाजप – ७४

  राष्ट्रवादी – ६८

  काँग्रेस – २७

  ठाकरे गट- १९

  शिंदे गट – १

  इतर – १४

 

 • रत्नागिरी : जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायत निवडणुकीत
  ठाकरे गट १०१
  शिंदे गट ४५
  भाजप १७
  राष्ट्रवादी काँगेस ८
  काँगेस ३
  इतर ४७

 

 • ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट-भाजपाला जिंकून दिल्याबद्दल सर्व जनतेचे आणि मतदारांचे आभार- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

 

 • सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल – एकूण जागा ४१६ / ३४६ निकाल

  भाजप गट – ८६
  ठाकरे गट – ८
  शिंदे गट – २९
  राष्ट्रवादी – ११३
  कॉग्रेस – ४२
  इतर- ६८

 

 • संगमनेर तालुक्यातील ३७ पैकी ८ गावांत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाचे सरपंच निवडून आले आहेत.

 

 • चंद्रपूर : जिल्हा ग्रामपंचायत सरपंच निकाल- ५८,
  भाजप २८
  काँग्रेस २१
  राष्ट्रवादी २
  ठाकरे गट २
  गोंडवाना गणतंत्र १
  शेतकरी संघटना ३
  इतर २

 

 • उस्मानाबाद निकाल : एकूण ग्रामपंचायती- १६६,
  भाजप – ६२
  काँग्रेस – ९
  राष्ट्रवादी – ३,
  ठाकरे गट- १७
  शिंदे गट – ३

 

 • ९०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय; महाविकास आघाडीच पहिल्या नंबरवर – नाना पटोले

 

 • पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २२१ पैकी ९२ ग्रामपंचायती ताब्यात घेत गड राखला आहे. भाजपाला अवघ्या ३८ ठिकाणी विजय मिळाला आहे.

 

 • बुलढाणा तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व

 

 • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या फेटरी गावात काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसचे रवी खंबालकर यांनी भाजपच्या सुरेश लंगडे यांचा पराभव केला आहे.

 

 • नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर – जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायती – १२३, जाहीर झालेले निकाल – १२३ ,

  भाजपा – ३२,

  काँग्रेस – ३३,

  राष्ट्रवादी – ०३,

  शिंदे गट – ३२,

  उद्धव गट – १३,

  अपक्ष – १०

 

 • धुळे : शिरपूर तालुक्यात १७ पैकी १७ जागांवर भाजप विजयी

 

 • जळगाव- ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर दर्शनासाठी जाताना दगडफेकीत भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

 

 • औरंगाबादच्या ३ तालुक्यात उमेदवारांना सामान मत चिठ्ठी काढून केले विजेते जाहीर

  औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील कन्नड तालुक्यातील गराडा ग्रामपंचायत निवडणुकीत सख्या मावस भावांच्या बायका ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र मतमोजणी सुरु असतानाच दोन्ही उमेदवारांना ५४० मत मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढावी लागली. त्यानंतर पूजा सचिन राठोड यांचा विजय झाला आहे. पूजा सचिन राठोड या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर रेश्मा राहुल राठोड एकनाथ या शिंदे गटाकडून रिंगणात होत्या. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. तर आपणच विजय होणार असा दावा देखील दोन्ही गटाकडून करण्यात आला होता.

  औरंगाबाद तालुक्यातील लायगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी समान मत पडली आहे. नामदेव बोंगाणे आणि चंद्रकांत बोंगाणे यांना समान १८३ मते पडली होती. काढण्यात आलेल्या चिठ्ठीनंतर चंद्रकांत बोंगाणे यांचा विजय झाला आहे.

  औरंगाबाद जिल्ह्यातील पिंपळगाव पांढरी येथे देखील दोन्ही उमेदवार यांना समान मते पडली आहे. जयश्री ठोंबरे आणि पुष्पा ठोंबरे यांना १४५ समान मते पडली होती. काढण्यात आलेल्या चिठ्ठीनंतर जयश्री ठोंबरे विजयी झाल्या आहेत.

 

 • बीड ग्रामपंचायत : एकूण ग्रामपंचायत – ७०४ त्यापैकी ३३ ग्रामपंचायत बिनविरोध तर ६७१ साठी मतमोजणी सुरू:

  भाजप – २०७

  राष्ट्रवादी – २४५

  काँग्रेस – ०६

  शिवसेना ठाकरे गट – १४

  शिवसेना शिंदे गट – २३

  वंचीत – ०२

  इतर – १८

 

 • जालना : जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी २८ तर मंठा तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींपैकी १८ घोषित ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरपंच व सदस्य बहुमताने विजयी झाले आहेत.

 

 • जोर्वे गावात सरपंचपदी भाजपचा विजय. जोर्वे थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखे गटाकडे तीन ग्रामपंचायती. जोर्वे, निंबाळे, मालुंजे येथे भाजपची सत्ता. १३ सदस्यांपैकी विखे गट – ४, थोरात गट – ९. १७ जागेचा निकाल जाहीर. काँग्रेसकडे १४ जागा.

 

 • संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई सरपंचपदी.अपक्ष उमेदवारी करत निवडणूक रिंगणात.

 

 • अमरावती : बिनविरोध ग्रामपंचायत एकूण – ५
  काँग्रेस – २४
  भाजप – ९
  शिवसेना – १
  प्रहार – ७
  वंचित बहुजन आघाडी – १
  युवा स्वाभिमान – ४
  शिंदे गट – १
  राष्ट्रवादी – २
  मनसे – ०
  इतर – ७

 

 • अक्कलकोटमधील सलगर गावात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना धक्का. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे समर्थक ज्योती डोंगराजे ४०० मतांनी विजयी

 

 • औरंगाबाद जिल्ह्यात २०८ ग्रामपंचायतीचे मतमोजणी प्रक्रिया सुरु असून ५० जागांचे निकाल हाती आले आहेत. यात सर्वाधिक १५ जागा शिंदे गटाला मिळाल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर १३ जागा मिळवून भाजप पक्ष आहे. तर ९ जागेसह ठाकरे गट तिसऱ्या क्रमांकावर असून राष्ट्रवादी ४ जागांसह चौथ्या क्रमांकावर आहे. २ जागांसह काँग्रेस पाचव्या स्थानावर आहे.

 

 • अकोला जिल्ह्यातील ‘शिवशक्ती-भिमशक्ती  राज्यातली पहिली ग्रामपंचायत विजयी

  उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या ‘शिवशक्ती-भिमशक्ती आघाडीची अकोला जिल्ह्यातील बोंदरखेड ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता. दोन्ही पक्षांच्या मैत्रीवर राज्यातली पहिली ग्रामपंचायत विजयी. सरपंचपदी शिवशक्ती-भिमशक्तीचे नंदकिशोर गोरले विजयी. सर्वच्या सर्व सात सदस्य विजयी.

 

 • नागपूर जिल्ह्यातील एकूण २३६ ग्रामपंचायतींपैकी २० ग्रामपंचायतींचे निकालांची प्राथमिक माहिती मिळाली असून यापैकी निकाल खालील प्रमाणे आहे.

  ठाकरे गट शिवसेना – 0
  शिंदे गट – 0
  भाजप- 10
  राष्ट्रवादी- 2
  काँग्रेस- 5
  इतर- 3

 

 • जालना ग्रामपंचायत  : माजी मंत्री भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या लोणी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा विजय झाला आहे. भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार गजानन लोणीकर विजयी

 

 • बारामती तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. आहे. त्यामध्ये सोरटेवाडी, कऱ्हाटी आणि पळशी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला आहे.

 

 • सिल्लोड तालुक्यातील सारोळा आणि कासोड ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात.

 

 • पैठण तालुक्यातील हीरापुर आणि जांभळी गावात शिंदे गटाच्या ताब्यात.

 

 • औरंगाबाद तालुक्यात बनगाव ग्रामपंचायतमध्ये भाजपच्या उषाबाई मुरमे यांचा विजय झाला आहे.

 

 • पैठणच्या बोकुड जळगाव कविता नागे संरपच पदी विराजमान.

 

 • सिल्लोड येथील बोरगाव येथे शिंदे गटाचे सत्तार बागवान सरपंच पदी विजयी.

 

 

Karnataka । विधानसभा सभागृहात लावला सावरकरांचा फोटो…


News Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!