NDTVNewsIpdate : प्रणव रॉय पाठोपाठ रविश कुमार यांचाही एनडीटीव्हीचा राजीनामा…

नवी दिल्ली : रविश कुमार यांनी एनडीटीव्हीमधून राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. हा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचेही बोलले जात आहे. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांच्या हातात येताच एनडीटीव्ही व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात येत आहेत.
यापूर्वी, एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी एनडीटीव्हीच्या प्रवर्तक पदाचा आणि आरआरपीआरएचच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत दोघांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. एनडीटीव्हीच्या अधिग्रहणासाठी अदानी समूहाने एक खुली ऑफर आणली आहे.