IndiaNewsUpdaate : भीषण आगीत एकाच कुटुंबांतील सहा जणांचा मृत्यू

फिरोजाबाद : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये आगीच्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबांतील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेत तीन लोक जखमी झाले आहेत. हे कुटुंब राहत असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत या कुटुंबीयांनी जीव गमावला आहे. जसराना भागातील पढाम शहरात ही दुर्घटना घडली आहे.या घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पीडित कुटुंबाला दोन लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
प्रथमदर्शनी ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानासह पहिल्या मजल्यावरील दुकान मालकाचे घर जळून खाक झाले आहे.
Uttar Pradesh | 2adults & 4children of a family lost their lives in a fire that was ignited due to short circuit in an inverter factor, in Padham town of Jasrana area under Firozabad district. 18 fire tenders reached on spot along with Police: Ashish Tiwari, SP Firozabad Police pic.twitter.com/nnIaYYt7xh
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 29, 2022
आग्रा, मैनपुरी, एटा आणि फिरोजाबाद येथील अग्निशमन दलाच्या १८ गाड्या आणि १२ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे बचावकार्य राबवण्यात येत आहे. दाटीवाटीची वस्ती असल्याने बचावकार्य राबवण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशिष तिवारी यांनी दिली आहे. या इमारतीच्या आत अडकलेल्या लोकांचा जवानांकडून शोध घेतला जात आहे.