Cyber Crime | आदर पुनवला यांना तब्बल एक कोटीचा गंडा
Cyber Crime : करोना लसीचा पुरवठा करणारे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनवला यांचा मोबाइल नंबर हॅक करून त्यांना तब्बल एक कोटीचा गंडा घातला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघांना बिहारमधून ताब्यात घेतले आहे.
दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढत असल्यामुळे अनेकांना आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. (Adar Poonawalla) आदर पुनवला यांचा मोबाइल नंबर हॅक करून बनावट व्हाट्सअप मेसेज पाठवले. यानंतर सिरमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे मेसेज पाठवून विविध खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले. दरम्यान, आरोपींनी १ कोटी एक लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली आहे. राजीवकुमार शिवाजी प्रसाद, चंद्रभूषण आनंद सिंग, कन्हैया कुमार संभो महतो आणि रवींद्र कुमार हुबनाथ पटेल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सिरम कंपनीचे संचालक सतीश देशपांडे यांच्या मोबाईलवर कंपनीचे सीईओ आदर पुनवला यांच्या मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअप मेसेज आला. त्या मेसेजमध्ये काही बँक खाते नंबर देण्यात आलेली होती. त्या नंबरवर तात्काळ पैसे पाठवण्यासाठी आरोपींनी मेसेज केला होता. सात आणि आठ सप्टेंबरला आरोपीने आदर पुनावाला यांचा मोबाईल हॉक करून त्यांचा नंबर वापरुन पैशासाठी मेसेज केला होता. त्यानंतर आता आदर पुनवला यांना गंडा घालणाऱ्या या आरोपींना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. पुणे पोलिसांनी बिहारमधून या आरोपींना अटक केलेली आहे.
Cyber Crime | Cyber Crime | Cyber Crime