#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
29. Oct. 2022 – Saturday
केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahanayakOnline | #NewsUpdate
-
Osmanabad : आमदार कैलास पाटील यांचे आंदोलन चिघळले, पॉलिटेक्निक कॉलेज समोर एसटीची तोडोफोड
-
Nandurbar : शिंदे गटाचा पहिला मेळावा आज नंदूरबारमध्ये, दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा
-
Marathon baithak : 31 ऑक्टोबरपासून ठाकरेंच्या मॅरेथॉन बैठका होणार सुरू… आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढायचे का? उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन आढावा घेणार आहे.
-
Delhi : दिल्लीत मोठा विमान अपघात टळला, बंगळुरुकडे निघालेल्या इंडिगो विमानाच्या इंजिनात आग, वेळीच विमान रोखल्याने 184 प्रवासी बचावले
गल्ली ते दिल्ली
-
शिंदे गटाचा पहिला मेळावा आज नंदूरबार येथे होणार आहे. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची जाहीर सभा होणार आहे.
-
Aurangabad : शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त (Aurangabad) औरंगाबादच्या पैठणमध्ये शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या नेत्या (Sushma Andhare) सुषमा अंधारे या प्रमुख वक्त्या म्हणून भाषण करणार आहेत. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे देखील उपस्थित असणार आहेत.
-
Osmanabad : आमदार कैलास पाटील (Kailas पाटील) यांच्या उपोषणाचा काल पाचवा दिवस संपला. अजूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आज उस्मानाबाद बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
-
Mumbai : मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांची दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
-
Yavatmal : आमदार बच्चू कडू यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दुपारी १२ वाजता बाभूळगाव येथून दौऱ्याला सुरुवात होईल. नुकसानीची पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.