IndiaMarketNewsUpdate : बघा तर खरं : दिवाळीत झालेल्या एकूण खरेदी विक्रीचा आकडा पाहून तुम्हालाही वाटेल कमाल …

नवी दिल्ली : कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर देशभरात व्यवसायाला वेग आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यावेळी देशभरात पंचांग तिथीनुसार काल आणि आज असे दोन दिवस धनत्रयोदशीचा सण साजरा करण्यात आला. एका अंदाजानुसार, या कालावधीत देशभरात ४५ हजार कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे. यामध्ये एकट्या ज्वेलरी व्यवसायाचा आकडा २५ हजार कोटी इतका आहे. दुसरीकडे, दिवाळीच्या मुहूर्तावर एकूण विक्रीचा आकडा १.५० लाख कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Indian Market News Update : धनत्रयोदशीच्या दिवशी साधनसामग्रीची खरेदी केली जाते आणि या दृष्टीने देशभरातील व्यापारी दीपावलीच्या पूजेसाठी आणि व्यवसायासाठी आवश्यक साधनसामग्रीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील दागिन्यांसह इतर सेगमेंटमध्येही ग्राहकांनी जोरदार खरेदी केली आहे. २५ हजार कोटींचे दागिने खरेदी करण्यात आले आहेत, तर दुसरीकडे, ऑटोमोबाईल, संगणक आणि संगणकाशी संबंधित वस्तू, फर्निचर, घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू, मिठाई आणि फराळ, स्वयंपाकघरातील वस्तू, सर्व प्रकारची भांडी, इलेक्ट्रॉनिक्स, सुमारे २० कोटींचे मोबाईल आणि संबंधित गोष्टींची विक्री झाली आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, काल आणि आज दोन दिवसांत देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी होती. ते म्हणाले की, भारतीय वस्तू खरेदी करण्याच्या उत्सुकतेचे मूल्यांकन हे पुष्टी करते की कोरोनामुळे दोन वर्षे बाजारापासून दूर असलेले ग्राहक आता पुन्हा बाजारात परतले आहेत.
दिवाळीच्या मुहूर्तावर देशभरात मोठ्या प्रमाणावर खरेदीचा अंदाज सीएआयटीने वर्तवला आहे. यावर्षी दिवाळीत विक्रीचा आकडा १ लाख ५० हजार कोटी रुपयांच्या पुढे जाईल असा सीएआयटीचा अंदाज आहे.
Indian Market News Update
#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment
#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide