Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraPoliticalUpdate : चर्चेतली बातमी : राज ठाकरे आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी काय म्हणून गेले ?

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : आपल्याकडे दोन राजकारणी भेटले कि चर्चा हि हमखास होतेच आजही तसेच झाले . आज दुपारच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. तर त्यांच्यापाठोपाठ राज्याच्या माजी शालेय शिक्षणमंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनीही वर्षा बंगल्यावर पोहोचल्या.


MaharshtraPoliticalUpdate: यावेळी सांगण्यात येत आहे की, राज ठाकरे यांनी राज्याच्या आरोग्यविषयक प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर काँग्रेस नेत्या वर्ष गायकवाड यांनी राज्यातील शालेय प्रश्नांवर चर्चा केली. शालेय शिक्षण विभागातील काही प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर काही गंभीर मुद्यांवर त्यांची चर्चा झाली. राज ठाकरेंनी आरोग्य विषयक मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची भेट घेतली तेंव्हा राज ठाकरे यांनी विचारलेल्या आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनाही मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर पाचारण केले होते.

Advertisements

MaharshtraPoliticalUpdate : दरम्यान आरोग्यविषयक मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर वृत्त वाहिन्यांनी म्हटले आहे कि , पुढे राज यांची मुख्यमंत्र्यांशी राजकीय चर्चा झाल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबतही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पोटनिवडणुकीत या भेटीनंतर आपली भूमिका जाहीर करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

या दोघांच्या शिवाय काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि अमिन पटेल यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे वृत्त आहे. मिलिंद देवरा आधीही महापालिकेच्या प्रश्नावरून मुख्यमंत्रीनां भेटलेले आहेत त्यांची हि दुसरी भेट आहे.


#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

 

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

For current updates join

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide

https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

आपलं सरकार

Click to listen highlighted text!