HingoliCrimeUpdate : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून चौघांविरुद्ध गुन्हा

हिंगोली / प्रभाकर नांगरे : पाच लाख हुंड्याच्या रकमेचा तगादा लावून बंद खोलीमध्ये मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गोरेगाव पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल. सदरील घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या मौजे आजे गाव येथील एका वीस वर्षीय युवतीला हुंड्याची पाच लाख शिल्लक राहिलेले रक्कम घेऊन ये असा तगादा लावत घरात कोंडून व उपाशीपोटी ठेवून मारहाण करत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना दिनांक 12/10/22 रोजी दोन वाजता दरम्यान राहत्या घरी सासरच्या जासास कंटाळून अखेर आरती ऊर्फ अंजली ने वय वीस वर्षे या युवतीने टोकाची भूमिका घेत गळफास घेऊन आत्महत्या केली.
एका २० वर्षीय महिलेस आत्महत्या करण्यास प्रवर्त केल्याप्रकरणी दिनांक 13/10/22रोजी लोड जी कुंडलिक पळसकर राहणार झोडगा वाशिम यांच्या फिर्यादीनुसार आरोपी रामदास धोंडबा गोरे ,धोंडबा राजाराम गोरे ,कांताबाई धोंडबा गोरे, कुमारी दिपाली धोंडबा गोरे, राहणार आजेगाव यांच्या विरुद्ध कलम 306 ,304, ब 498, 294 ,323 ,504 34 भादवी कलमनुसार गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा तपास वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील व उपनिरीक्षक बाबुराव जाधव हे करत आहेत.