ShivsenaNewsUpdate : आगामी निवडणूक जिंकण्यासाठी तयारीला लागण्याचे उद्धव ठाकरे यांचे शिवसौनिकांना आवाहन …

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाकड़ून शिवसेनेच्या दशहरा मेळाव्यासाठी दादरवरील मैदान मिळताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधत महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश दिला. तसंच निवडणुकीच्या तोंडावर रुसवे, फुगवे, गट पडू देऊ नका असा सल्लाही दिला. हायकोर्टात एकीकडे दसरा मेळावा प्रकरणी सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरे आज त्र्यंबकेश्वरमधील शिवसैनिकांशी संवाद साधत होते.
ShivsenaNewsUpdate : मेळाव्याच्या जागेच्या परवानगीचे वृत्त समजताच उद्धव ठाकरेंसमोर कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा देत आपण सोबत असल्याची हमी दिली. दरम्यान त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी मी लवकरच नाशिकला येणार आहे. तिथे गर्दीचा रेकॉर्ड मोडणारा मेळावा घेऊ असा निर्धार केला.
ठाकरे पुढे म्हणाले “उत्साह अमाप आहे, पण एकजुटही तशीच ठेवा. आपल्याला प्रत्येक महापालिका जिंकायचीच आहे, शिवसेनेचा भगवा फडकावयचाच आहे. निवडणूक आल्यावर रुसवे, फुगवे, गट पडणं अशा गोष्टी होऊ देऊ नका. उमेदवारी फार माोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे तयरीला लागा”.
ShivsenaNewsUpdate
#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment
#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide